Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Brother murdered :कौटुंबिक नातेसंबंधांतील तणाव किती टोकाला जाऊ शकतो, याचे हादरवून टाकणारे उदाहरण खामगाव तालुक्यातील राहुड येथे समोर आले आहे. सख्ख्या भावानेच दुसऱ्या भावाची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Brother murdered
राख व अस्थि फेकल्या नदीत ; खामगाव तालुक्यातील राहुड येथील घटना

खामगाव : कौटुंबिक नातेसंबंधांतील तणाव किती टोकाला जाऊ शकतो, याचे हादरवून टाकणारे उदाहरण खामगाव तालुक्यातील राहुड येथे समोर आले आहे. सख्ख्या भावानेच दुसऱ्या भावाची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बीज प्रक्रिया केंद्र की प्रदूषण निर्मिती केंद्र? देऊळगाव राजा शहराला प्रदूषणाचा विळखा

माहितीनुसार, रोशन संजय इंगळे (वय ३६) धाकटा भाऊ चेतन संजय इंगळे (वय ३५) याचा खून केला. या कृत्यासाठी त्याने खामगाव येथील महाकाल चौकात राहणाऱ्या रवी देवीदास राऊत (वय ३६) याची मदत घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
२५ फेब्रुवारीपासून चेतन बेपत्ता होता. गावात चर्चेला उधाण आल्याने पोलीस पाटलांनी संशय व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार भागवत मुळीक व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. संशयाच्या आधारे रोशन इंगळे याला ताब्यात घेण्यात आले, तसेच रवी राऊत यालाही अटक करण्यात आली. तपासात उघड झाले की, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास आरोपींनी स्वतःच्या शेतात चेतन याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी लाकडे गोळा करून मृतदेह जाळण्यात आला. तसेच अस्थी व राख नदीत फेकून देण्यात आल्याचेही समोर आले आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही घटना समाजासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top