Farmers’ sit-in protest : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री फुंडकर तसेच विधानसभा आमदार खंडेलवाल यांच्या आदेशांची अंमलबजावणी संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचा आरोप करत शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राहुल सोनोने
दिग्रस बु. : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री फुंडकर तसेच विधानसभा आमदार खंडेलवाल यांच्या आदेशांची अंमलबजावणी संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचा आरोप करत शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
रस्ता रोकोदरम्यान बाबुळगाव बसस्थानकाजवळ रुग्णवाहिका १५ मिनिटे अडकली
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, सीईओ वैष्णवी, मेश्राम मॅडम तसेच माजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या स्तरावर आदेशांकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. पातुर तालुक्यातील रोजगार हमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
तसेच पातुर तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले. मागील दीड वर्षांपासून शेतकरी शासनाकडे हक्कासाठी पाठपुरावा करत आहेत; मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.या ठिय्या आंदोलनात ज्ञानेश्वर गाडगे, दिलीप परनाटे आदींसह शेतकरी राजा ग्रुप, पातुर तालुक्याचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

