Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Ambulance stuck :रस्ता रोकोदरम्यान बाबुळगाव बसस्थानकाजवळ रुग्णवाहिका १५ मिनिटे अडकली

Ambulance stuck : बाळापूर–पातूर मार्गावर ठाकरे गटाच्या वतीने केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान बाबुळगाव बसस्थानकाजवळ एक रुग्णवाहिका सुमारे १५ मिनिटे अडकून पडल्याची घटना घडली.

Ambulance stuck

राहुल सोनोने 

वाडेगाव : बाळापूर–पातूर मार्गावर ठाकरे गटाच्या वतीने केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान बाबुळगाव बसस्थानकाजवळ एक रुग्णवाहिका सुमारे १५ मिनिटे अडकून पडल्याची घटना घडली.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी अकोला या पेजला भेट द्या 

रुग्णवाहिकेचे चालक सुधाकर धाडसे यांनी माईकवरून वाहनात रुग्ण असल्याची माहिती देत रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून मार्ग मोकळा करून दिला. दरम्यान, रस्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिकेचा वारंवार हॉर्न वाजत असूनही तिला तातडीने मार्ग मिळाला नाही, यामुळे नागरिकांत चर्चा रंगली.

सदर रुग्णवाहिकेत भंडारज येथील २२ वर्षीय गरोदर महिला सरोज शिंदे यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येत होते, अशी माहिती चालकाने दिली. प्राथमिक उपचार स्थानिक बाबुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याकडे रवाना करण्यात आले होते.चालक सुधाकर धाडसे यांच्या मते, रुग्णवाहिका सुमारे १७ मिनिटे आंदोलनामुळे थांबून होती. या घटनेमुळे आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होऊ नये, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top