Mahabreaking

🔴 BREAKING
Self-Defense Training :बुलढाण्यात नारीशक्तीला मिळणार स्वसंरक्षणाचे धडे! The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Self-Defense Training :बुलढाण्यात नारीशक्तीला मिळणार स्वसंरक्षणाचे धडे! The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ

Veterinary government service :‘वेतन शासनाचे, पण उपचार खाजगीतून; दे. राजा तालुक्यात पशुवैद्यकीय शासकीय सेवा नावालाच

Veterinary government service :‘तालुक्यात देऊळगाव राजासह पशुवैद्यकीय दवाखान्यांची एकूण चार केंद्रे आहेत. मात्र या केंद्रांवर अपुरे मनुष्यबळ, औषधसाठ्याचा अभाव तसेच कर्तव्यावर असलेल्या काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उदासीनता यामुळे तालुक्यातील पशुधन व पशुपालक अडचणीत सापडले आहेत. आज केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली.

Veterinary government service

मनुष्यबळाचा तुटवडा, औषधसाठ्याचा अभाव आणि अपुरी उपकरणे; वेळेवर उपचार दुरापास्त

गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यात देऊळगाव राजासह पशुवैद्यकीय दवाखान्यांची एकूण चार केंद्रे आहेत. मात्र या केंद्रांवर अपुरे मनुष्यबळ, औषधसाठ्याचा अभाव तसेच कर्तव्यावर असलेल्या काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उदासीनता यामुळे तालुक्यातील पशुधन व पशुपालक अडचणीत सापडले आहेत. आज केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली.

आयुष क्रांतीचे दर्शन: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुभवली शेगावमधील भव्य आरोग्य प्रदर्शनी

शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी दुधाळ जनावरे, शेतीकामासाठी लागणारे बैल तसेच इतर पाळीव प्राण्यांचे पालन करतात. शासनाच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या जनावरांच्या उपचारासाठी नाममात्र दहा रुपये शुल्क आकारले जाते. मात्र काही ठिकाणी डॉक्टरांकडून औपचारिक उपचार करून पशुपालकांना खाजगी उपचारांचा सल्ला दिला जात असल्याचे दिसून आले. खाजगी उपचारांमध्ये मनमानी शुल्क आकारले जात असल्याने पशुपालकांवर आर्थिक भार वाढत आहे.

शासनाकडून कमी शुल्कात उपचार करण्याचा आदेश असतानाही बहुतांश पशुवैद्य खाजगी उपचारांकडे वळत असल्याची तक्रार आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने या दवाखान्यांना कोणी वाली नाही का, असा प्रश्न पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील सर्व दवाखान्यांसाठी शासनाकडून एकूण १२ पदे मंजूर असून त्यापैकी ८ पदे भरलेली आहेत, तर ४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याबाबत शासनस्तरावर हालचाली दिसत नाहीत. शासकीय सेवेतील काही अधिकारी-कर्मचारी कर्तव्याकडे दुर्लक्ष करून खाजगी उपचारांना प्राधान्य देत असल्याने दवाखान्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आपत्कालीन सेवा दुर्मिळ
वातावरणातील बदल, पशुखाद्यातील बदल, लसीकरण, कृत्रिम रेतन व आपत्कालीन उपचार या सेवा नियमितपणे उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे पशुपालकांना खाजगी उपचारांचा पर्याय स्वीकारावा लागतो आणि त्यातून आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

औषध विक्रेते व अधिकाऱ्यांचे संगनमत?
काही ठिकाणी विशिष्ट औषध विक्रेत्याकडूनच औषधे आणण्याचा सल्ला देण्यात येतो. आवश्यकतेपेक्षा जास्त औषधे लिहून दिली जात असल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे शासकीय दवाखान्यांतील नाममात्र शुल्कात उपचार ही संकल्पना प्रत्यक्षात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

कोणत्या सुविधांचा अभाव?
जनावरांच्या आरोग्यावर वातावरणातील बदलांचा विपरीत परिणाम होत असल्याने तातडीच्या उपचारांची गरज असते. मात्र अत्यावश्यक औषधे, लसी, शस्त्रक्रिया साधने, रक्ततपासणी यंत्रणा, प्रयोगशाळा तसेच थंड साखळी व्यवस्था अपुरी असल्याने लसीकरण व उपचारांवर परिणाम होत आहे. वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे.

तालुक्यातील पशुधनाची संख्या
तालुक्यात गायवर्ग २६,२५६, म्हैसवर्ग ८,९५९, मेंढ्या ५,०९३, कोंबड्या ६८,१०७ तसेच घोडे, गाढवे, डुकरे, कुत्रे आदी पाळीव प्राणी मिळून एकूण १,३४,२४७ पशुधन ६२ गावांमध्ये आहे. या पशुधनासाठी केवळ ८ पशुवैद्यक व कर्मचारी कार्यरत असल्याने ही यंत्रणा अपुरी असल्याचे स्पष्ट होते.

एका दवाखान्यावर २० ते २२ गावे
तालुक्यातील ६२ गावांसाठी देऊळगाव राजा, देऊळगाव मही, अंढेरा आणि पांगरी माळी अशी चार केंद्रे कार्यरत आहेत. भौगोलिक स्थिती पाहता एका दवाखान्यावर सुमारे २० ते २२ गावे अवलंबून आहेत. अपुरे मनुष्यबळ व उदासीनता यामुळे हे दवाखाने केवळ नावापुरतेच राहिल्याची भावना पशुपालकांत आहे.

मंजूर व कार्यरत पदांची स्थिती
• सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन – २ पदे (दोन्ही भरलेली)
• पशुधन विकास अधिकारी – ३ मंजूर (२ भरलेली, १ रिक्त)
• सहाय्यक पशुधन विकास अधिकारी – १ (भरलेले)
• सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी – १ (भरलेले)
• परिचारक – ५ मंजूर (३ भरलेले, २ रिक्त)
तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेता अतिरिक्त केंद्रे मंजूर करावीत व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम
आपत्कालीन स्थितीत जनावरे आजारी पडल्यास दूध उत्पादन घटते. उपचारांमध्ये विलंब झाल्यास मृत्यूचा धोका वाढतो. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो.
‘लोकमत’च्या पाहणीत देऊळगाव राजा येथील सहाय्यक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन कार्यालय कार्यालयीन वेळेत बंद असल्याचे आढळले.

“तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पशुपालकांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना करण्यात येतील. औषधसाठ्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. खाजगी उपचारांबाबत तक्रार आल्यास चौकशी करून कार्यालयीन वेळेत असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल.”
डॉ. योगेश अक्षेय, सहाय्यक उपआयुक्त तथा तालुका पशुधन व दुग्ध व्यवसाय अधिकारी
“माझ्याकडे दोन गायी, दोन बैल व इतर मिळून सात जनावरे आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार मिळत नाहीत. उपचार मिळाले तरी औषधे खाजगीतून आणावी लागतात. त्यामुळे आर्थिक फटका बसतो.”

अनिल वाघ, पशुपालक, पांगरी माळी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top