Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Maa Jagdamba Devi :महाराणा प्रताप नगरात माँ जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

Maa Jagdamba Devi : येथील महाराणा प्रतापसिंह नगरात माँ जगदंबा देवी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. दि. १७ पासून सुरू झालेल्या सप्ताहभर चाललेल्या या सोहळ्याची दि. २३ रोजी पालखी मिरवणूक व महाप्रसाद वितरणाने भक्तीपूर्ण सांगता झाली.

Maa Jagdamba Devi
पालखी मिरवणूक व महाप्रसादाने भक्तीपूर्ण सांगता; २४ वे वर्ष

साखरखेर्डा : येथील महाराणा प्रतापसिंह नगरात माँ जगदंबा देवी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. दि. १७ पासून सुरू झालेल्या सप्ताहभर चाललेल्या या सोहळ्याची दि. २३ रोजी पालखी मिरवणूक व महाप्रसाद वितरणाने भक्तीपूर्ण सांगता झाली.

शून्य थकबाकीसाठी सामूहिक कारवाईला सुरुवात,शेलगावात ३८ ग्राहकांचे मीटर जप्त

सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा यंदा २४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दररोज सकाळी ५.०० ते ६.०० काकड आरती, जगदंबा मातेचे पूजन, दुपारी ग्रंथवाचन व पूजा, सायंकाळी श्री हरिपाठ आणि रात्री भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी १.०० ते ५.०० या वेळेत परतवाडा (जि. अमरावती) येथील प्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प. मनोज महाराज यांच्या अमृतमय वाणीतून श्रीरामायण कथा भाविकांना ऐकविण्यात आली. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज मगर, करण व दीक्षित यांनी संगीतमय साथ दिली. गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दि. २३ रोजी सकाळी काकड आरतीनंतर देवीच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराणा प्रताप नगरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मार्ग महिलांनी स्वच्छ करून आकर्षक रांगोळ्यांनी सजविला होता. मिरवणुकीत महिलांचा विशेष सहभाग लक्षवेधी ठरला.सायंकाळी ५.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी सुमारे ११ क्विंटल चार महाप्रसाद भाविकांना देण्यात आला.

मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा इतिहास 

२४ वर्षांपूर्वी, ६ मार्च २००२ रोजी सोनई (जि. अहिल्यानगर) येथील ह.भ.प. आप्पा महाराज व ब्रह्म समुदायातील २१ मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप नगरातील मंदिरात जगदंबा देवीच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. यावेळी तीन दिवस होमहवन, पूजा व अभिषेकाचे कार्यक्रम पार पडले होते. तेव्हापासून आजतागायत हा उत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात येत आहे.जन्मोत्सवामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये समाधान व भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले.

जिल्ह्यातील  इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top