Mahabreaking

[breaking_news]

Shiv Jayanti :स्किल पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिवजयंतीचा राजेशाही उत्सव

Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्किल पॅरामेडिकल कॉलेज, बुलढाणा येथे २०२६ सालची शिवजयंती अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तीभावपूर्ण आणि राजेशाही थाटामाटात साजरी करण्यात आली. महाविद्यालय परिसर भगव्या पताका, आकर्षक सजावट आणि शिवचरित्र दर्शविणाऱ्या फलकांनी सजविण्यात आला होता.

Shiv Jayanti

शिवरायांच्या विचारांचा जागर; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्किल पॅरामेडिकल कॉलेज, बुलढाणा येथे २०२६ सालची शिवजयंती अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तीभावपूर्ण आणि राजेशाही थाटामाटात साजरी करण्यात आली. महाविद्यालय परिसर भगव्या पताका, आकर्षक सजावट आणि शिवचरित्र दर्शविणाऱ्या फलकांनी सजविण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या प्रा. सौ. चैताली पाटील मॅडम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून स्किल अक्यूपंक्चर कॉलेज, बुलढाणा येथील श्री. संजय सोनुने सर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, संघटनकौशल्य आणि स्वराज्याची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडली. प्राचार्या प्रा. सौ. चैताली पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणात शिवाजी महाराजांचे आदर्श नेतृत्व, शिस्तप्रियता, स्त्रीसन्मानाची भूमिका आणि राष्ट्रप्रेमाचे विचार अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच चारित्र्यसंपन्न व समाजाभिमुख नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रा. उमेश सावळे, प्रा. सौ. कोमल लटके, प्रा. सौ. प्रियांका काकडे, प्रा. अभिषेक पाटील, प्रा. शुभम सुरडकर, प्रा. प्रतिभा जाधव, कु. शिल्पा जाधव, सौ. सोनाली गवई, कु. मेघा सुनगत, श्री. दिगंबर खंडागळे व सौ. लक्ष्मी ढोके यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित मनोगते, पोवाडे, देशभक्तीपर गीत आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन AD.DMLTच्या विद्यार्थिनी रेणुका भाकरे व साक्षी खेडेकर यांनी केले. नियोजन व संयोजन प्रा. सौ. प्रियांका काकडे यांनी केले, तर DMLT द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी प्रीती माकोने यांनी आभारप्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.

बुलढाण्यात ‘शाळा वाचवा’चा एल्गार; राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top