Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Naked body :बोराखेडी शिवारात १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला 

Naked body : तालुक्यातील बोराखेडी शिवारात १७ वर्षीय युवतीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Naked body
मोताळा :तालुक्यातील बोराखेडी शिवारात १७ वर्षीय युवतीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बोराखेडी शिवारातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या नदीपात्रात संबंधित युवतीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन विविध नमुने संकलित केले आहेत. प्राथमिक पाहणीत मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. मृत्यूमागील कारणांबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात असल्या तरी अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. काही नागरिकांनी पूर्वी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची आठवण व्यक्त करत अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी चिंता व्यक्त केली. पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोताळा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.

चिखला काकड गावात तणाव; शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top