Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Tractor driver dies :विजेच्या धक्क्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू;लोंबकळत्या तारांमुळे भीषण दुर्घटना

Tractor driver dies : वाकळवाडी मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान विजेच्या धक्क्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० फेब्रुवारी रोजी घडली.

Tractor driver dies

मेडशी : वाकळवाडी मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान विजेच्या धक्क्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० फेब्रुवारी रोजी घडली.

अकोला–नांदेड रोडवरील वाकळवाडी बायपासखाली रस्त्याच्या डाव्या बाजूच्या शेतात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या हायव्होल्टेज तारा अत्यंत धोकादायकरीत्या लोंबकळत होत्या. या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ट्रॅक्टर चालक गजानन नथुजी बोरकर (वय ५०, रा. पांगरी नवघरे) यांचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्याची दुरवस्था झाल्याने काही अंतराचे सिमेंटीकरण युद्धपातळीवर सुरू असून या कामासाठी ट्रॅक्टर टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या परिसरात अनेक वर्षांपासून विजेच्या तारा जमिनीजवळ लटकत होत्या; मात्र त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाले होते. या तारांमधून उच्च दाबाचा विद्युत प्रवाह सुरू असल्याने संपर्कात येताच चालकाचा मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांबाबत महावितरणने तातडीने उपाययोजना करून त्या सुरक्षित उंचीवर हलवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन व वीज वितरण कंपनीने वेळीच पावले उचलली नाहीत, तर भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

जिल्ह्यातील बातम्यासाठी वाशिम पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top