Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

 Shiv Jayanti :रविदास नगर, लोटनापुर येथे शिवजयंतीचा भव्य सोहळा

 Shiv Jayanti : रविदास नगर, लोटनापुर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी, फुलांच्या सजावटीने व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि शिवचरित्राच्या घोषणांनी लोटनापुर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता.

 Shiv Jayanti

परिसर शिवमय; जल्लोषात साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव

जाकीर अहमद 

बाळापूर : रविदास नगर, लोटनापुर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी, फुलांच्या सजावटीने व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि शिवचरित्राच्या घोषणांनी लोटनापुर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन व सामूहिक शिववंदनेने करण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, न्यायप्रियता, लोककल्याणकारी धोरणे आणि राष्ट्रप्रेम या गुणांचे मनोवेधक विवेचन केले. युवकांनी शिवरायांच्या विचारांवर चालण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, पोवाडे तसेच शिवचरित्रावर आधारित देखावे सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवजयंती उत्सव समिती, रविदास नगर, लोटनापुर यांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत शिवरायांना मानाचा मुजरा अर्पण केला.ही शिवजयंती केवळ उत्सव न ठरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मशाल प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणारा प्रेरणादायी सोहळा ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top