Mahabreaking

[breaking_news]

Subodh Savji :बारावी कॉपी प्रकरण उघड करणाऱ्या भरारी पथकाचा शासकीय सन्मान करा : माजी मंत्री सुबोध सावजी

Subodh Savji :इयत्ता बारावीच्या सामूहिक कॉपी प्रकरणावर धाडसी कारवाई करणाऱ्या भरारी पथकाचा शासन स्तरावर गौरव करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे १९ फेब्रुवारी रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Subodh Savji

डोणगाव : इयत्ता बारावीच्या सामूहिक कॉपी प्रकरणावर धाडसी कारवाई करणाऱ्या भरारी पथकाचा शासन स्तरावर गौरव करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे १९ फेब्रुवारी रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

सावजी यांनी पत्रात नमूद केले की, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, ता. वाशिम फाटा येथील बारावी परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक भेट दिली. यावेळी तब्बल ५८१ विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले. या प्रकरणात सहकार्य केल्याच्या आरोपावरून २६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

राज्यात शिक्षण क्षेत्रात वाढत्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला प्रकार उघडकीस आणणे ही अत्यंत धाडसी व उल्लेखनीय कारवाई असल्याचे सावजी यांनी म्हटले आहे. “न भूतो न भविष्यती” असे स्वरूप असलेल्या या घटनेने शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर नियंत्रणाची गरज अधोरेखित केली आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले.

अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून मोठ्या गैरप्रकाराला आळा घालणाऱ्या भरारी पथकाचा शासनाने अधिकृत सन्मान करावा, जेणेकरून इतर अधिकाऱ्यांनाही प्रामाणिक कारवाईस प्रोत्साहन मिळेल, अशी मागणी सावजी यांनी केली आहे.

डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top