Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Political battles :अकोला महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत राजकीय रणकंदन

Political battles : अकोला महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. स्वच्छता कंत्राट, पडीक वार्डांच्या स्वच्छतेसाठी वाढीव अर्थसंकल्प आणि झोन पुनर्रचनेच्या प्रस्तावावरून सभागृहात जोरदार खडाजंगी होत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

Political battles
स्वच्छता कंत्राट व झोन पुनर्रचनेवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; १६ सदस्यांची स्थायी समिती जाहीर

अकोला : अकोला महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. स्वच्छता कंत्राट, पडीक वार्डांच्या स्वच्छतेसाठी वाढीव अर्थसंकल्प आणि झोन पुनर्रचनेच्या प्रस्तावावरून सभागृहात जोरदार खडाजंगी होत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

शहरातील स्वच्छता कंत्राटाच्या चर्चेदरम्यान प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याऐवजी भाजपचे नगरसेवक उत्तर देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. पडीक वार्डांच्या स्वच्छतेसाठी बजेट वाढवण्याच्या प्रस्तावावरून दोन्ही बाजूंमध्ये तीव्र मतभेद उफाळले. विरोधकांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाऐवजी भाजपचे नगरसेवक विनोद मापारी उत्तर देत असल्याने विरोधक आक्रमक झाले आणि सभागृहात काही काळ गोंधळ माजला.

झोन पुनर्रचनेवरून जोरदार संघर्ष

सभेच्या सुरुवातीलाच महापालिकेच्या चार झोनच्या पुनर्रचनेचा मुद्दा ऐरणीवर आला. भाजपकडून मांडलेल्या प्रस्तावावर मतदानादरम्यान सदस्य मोजणीवरून वाद निर्माण झाला. सत्ताधारी-विरोधकांतील तीव्र संघर्षानंतर अखेर झोन पुनर्रचनेचा ठराव ४४ विरुद्ध २९ मतांनी मंजूर झाला.

स्थायी समितीत १६ सदस्यांची नियुक्ती

सभेदरम्यान स्थायी समितीसाठी विविध पक्षांतील सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

शहर सुधार आघाडी (९): विजय अग्रवाल, हरीश अलीमचंदाणी, सिद्धार्थ उपर्वट, योगिता पावसाळे, शरद तुरकर, मंजुषा शेळके, विनोद मापारी, नर्गिस परवीन फय्याज खान, पल्लवी मोरे.

काँग्रेस (४): सुवर्णारेखा विजय जाधव, आझाद खान अलीयार खान, मो. फजलू अब्दुल करीम, शाहीन अंजुम मेहबुब शेख.

शिवसेना (उबाठा) (१): सागर भारुका.
वंचित (१): निलेश देव.
एमआयएम (१): सैय्यद रहिम सैय्यद हाशम.

महापालिकेच्या पहिल्याच सभेत उफाळलेल्या राजकीय संघर्षामुळे पुढील काळातील सत्ताधारी-विरोधक संबंध अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top