Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Gajanan Hivarale : संविधानाचे रक्षण हीच काळाची गरज – डॉ. गजानन हिवराळे

Gajanan Hivarale : स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात दुपारच्या बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गजानन हिवराळे यांनी आजच्या काळात अनेक ठिकाणी संविधानाचे उल्लंघन होत असल्याने संविधानाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

Gajanan Hivarale

वाशीम : स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात दुपारच्या बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गजानन हिवराळे यांनी आजच्या काळात अनेक ठिकाणी संविधानाचे उल्लंघन होत असल्याने संविधानाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या बौद्धिक सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. डी. एम. ढवारे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. गजानन हिवराळे यांनी “भारतीय संविधानातील मूलतत्त्वे” या विषयावर सखोल मार्गदर्शन करत संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांचे महत्त्व स्वयंसेवकांना पटवून दिले. तसेच समाजाप्रती कर्तव्यभावना, सेवा वृत्ती आणि नेतृत्वगुण यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. रुपेश जाधव, प्रा. भारती राणे, प्रा. डॉ. पदमानंद तयाडे, प्रा. डॉ. रुक्के, प्रा. बोरकर आणि प्रा. खान उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रासेयोच्या सदस्या कु. श्रेया आरे हिने केले, तर आभार प्रदर्शन आशिष अंभोरे यांनी केले. उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात हा बौद्धिक कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top