District Collector : येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्रशासन व विकासकामांसाठी कार्यरत विद्यालय व्यवस्थापन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली.

यवतमाळ : येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्रशासन व विकासकामांसाठी कार्यरत विद्यालय व्यवस्थापन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली.
बैठकीस प्राचार्य किरण मेंढे, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, अमोलकचंद विद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल एकबोटे, अनिल इंगोले, प्रा. साहेबराव कदम, रचना घुगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र रामटेके तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस. श्रावगी आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मागील बैठकीतील इतिवृत्ताचा आढावा घेतला. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची नोंदणीस्थिती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, विद्यालयाची देखभाल व संवर्धन, सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंग पद्धतीने नियुक्ती, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदांसाठी कंत्राटी शिक्षकांचे पॅनेल तयार करणे आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी रस्त्याचे बांधकाम, पाईपलाईन जोडणी व गटार व्यवस्था, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसविणे, कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी यांसारख्या पायाभूत सुविधांबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय व सूचना देण्यात आल्या.

