Mahabreaking

🔴 BREAKING
Massive Fire at Vatika Chowk :शेगावात वाटिका चौकात भीषण आग, आठ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान  Jigaon project :अकोला शहराला दीड वर्षात जीगाव प्रकल्पातून मिळणार पाणी Dusrabid Gram Panchayat: दुसरबीड ग्रामपंचायतीच्या कारभाराची होणार चौकशी, लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता Microorganisms :बाळापुरातील शतरंजीपुरा भागात नळाच्या पाण्यात सूक्ष्मजीव आढळले District Health System :जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा होणार सक्षम, १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१  उपकेंद्रांना मंजूरी Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती Massive Fire at Vatika Chowk :शेगावात वाटिका चौकात भीषण आग, आठ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान  Jigaon project :अकोला शहराला दीड वर्षात जीगाव प्रकल्पातून मिळणार पाणी Dusrabid Gram Panchayat: दुसरबीड ग्रामपंचायतीच्या कारभाराची होणार चौकशी, लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता Microorganisms :बाळापुरातील शतरंजीपुरा भागात नळाच्या पाण्यात सूक्ष्मजीव आढळले District Health System :जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा होणार सक्षम, १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१  उपकेंद्रांना मंजूरी Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती

Maktab Ishaatul Uloom :मकतब इशाअतुल उलूमचे चौथे भव्य अधिवेशन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

Maktab Ishaatul Uloom : मकतब इशाअतुल उलूम, काग़ज़ीपुरा यांच्या वतीने चौथा भव्य सर्वसाधारण अधिवेशन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी नमाज-ए-मगरीबनंतर कॉटन मार्केट मैदान (बसस्थानकाच्या मागील बाजूस) येथे उत्साहात संपन्न झाला. या बरकतपूर्ण व प्रभावी कार्यक्रमात उलेमा-ए-किराम, शहरातील मान्यवर नागरिक, संरक्षक, पालकवर्ग तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Maktab Ishaatul Uloom

बाळापूर : मकतब इशाअतुल उलूम, काग़ज़ीपुरा यांच्या वतीने चौथा भव्य सर्वसाधारण अधिवेशन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी नमाज-ए-मगरीबनंतर कॉटन मार्केट मैदान (बसस्थानकाच्या मागील बाजूस) येथे उत्साहात संपन्न झाला. या बरकतपूर्ण व प्रभावी कार्यक्रमात उलेमा-ए-किराम, शहरातील मान्यवर नागरिक, संरक्षक, पालकवर्ग तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या अधिवेशनाचा विषय “आदर्श मार्गदर्शक, खरा हितचिंतक आणि उत्कृष्ट नेतृत्वाची व्यावहारिक मिसाल” असा ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद अशफाक साहेब (नाझिम व ट्रस्टी, बदरुस्सफा बिरादरी, भुसावळ) यांनी भूषविले, तर प्रमुख वक्ते म्हणून हजरत मौलाना मोहम्मद अखलाक साहेब (डायरेक्टर, जामिया बदरुस्सफा, भुसावळ) उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून कुरआन करीमच्या शिक्षणाचे महत्त्व, मुलांचे दीन व नैतिक शिक्षण तसेच पालकांच्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये धार्मिक जाणीव आणि ज्ञानार्जनाची प्रेरणा अधिक दृढ झाली.

कार्यक्रमातील विशेष उपलब्धी म्हणजे वर्ष २०२६ मध्ये मकतब इशाअतुल उलूमच्या ३२ विद्यार्थ्यांनी नाझिरा कुरआन शरीफ पूर्ण केला. त्यांना मंचावर बोलावून प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभर नियमित उपस्थिती ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. मकतबच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दीनि व शैक्षणिक कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाचे संचालन व समन्वय हजरत मौलाना मोहम्मद इस्माईल साहेब इशाअती बालापुरी (शिक्षक, मकतब इशाअतुल उलूम तथा अध्यक्ष, ट्रस्ट मस्जिद) यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी सर्व अतिथी, संरक्षक व नागरिकांचे आभार मानत हा यशस्वी सोहळा सामूहिक सहकार्य, निष्ठा व त्यागाचे फलित असल्याचे नमूद केले.

समारोपाच्या प्रसंगी काग़ज़ीपुरा, बलोचपुरा, डांगपुरा व बालापूर येथील धर्मप्रेमी नागरिकांना आपल्या मुलांना दीनि शिक्षणासाठी मकतबशी जोडण्याचे तसेच या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. अखेरीस सामूहिक दुआ करण्यात येऊन शहराची प्रगती, शांतता, सलोखा, बंधुता, दीनि जागृती तसेच संपूर्ण उम्मत-ए-मुस्लिमाहच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top