Mahabreaking

[breaking_news]

State level :अन्वी मिर्झापूर येथे राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा; सहभागी होण्याचे आवाहन

State level : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी अन्वी मिर्झापूर येथे भव्य राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजकांनी राज्यभरातील स्पर्धकांना आवाहन केले आहे.

State level

बोरगाव मंजू : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी अन्वी मिर्झापूर येथे भव्य राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजकांनी राज्यभरातील स्पर्धकांना आवाहन केले आहे.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अन्वी मिर्झापूर व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे दोन गट करण्यात आले आहेत. खुल्या गटासाठी “रचनात्मक प्रतिभावंत राजा शिवछत्रपती”, “तेजःपुंज तेजस्वी आँखे, निकल गई पर झुका नहीं” आणि “झटु सर्व भावे करू स्वर्ग गावा” या विषयांवर वक्तृत्व सादर करावे लागणार आहे. तर १० ते १६ वर्षे वयोगटातील लहान गटासाठी “छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व”, “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज” आणि “महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण की त्यांच्या पुतळ्याचे पूजन?” हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. खुल्या गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ५१११, ३१११ व २१११ रुपये पारितोषिक देण्यात येईल, तसेच उत्तेजनार्थ ११११ व ५५१ रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. लहान गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ३१११, २१११ व ११११ रुपये, तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५५१ रुपये देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेसाठी नावनोंदणी १७ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारण्यात येणार असून नियम व अटी बंधनकारक राहतील. अधिकाधिक स्पर्धकांनी या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top