Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

fire in Wadegaon :वाडेगावात निराधार महिलेच्या घराला भीषण आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

fire in Wadegaon : येथील एका निराधार महिलेच्या घराला लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य तसेच महत्त्वाची कागदपत्रे पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली.

fire in Wadegaon

 लोकवर्गणीतून दिला मदतीचा हात; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

राहुल सोनोने

वाडेगाव : येथील एका निराधार महिलेच्या घराला लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य तसेच महत्त्वाची कागदपत्रे पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या ग्रामपंचायत इमारतीजवळ दशमुखे गुरुजी यांच्या भाड्याच्या खोलीत मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधू रमेश आकोटकर या महिला वास्तव्यास आहेत. घटनेच्या वेळी त्या मंदिरात पोथी ऐकण्यासाठी गेल्या होत्या. घरातील विद्युत तारेत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घराला आग लागल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी तातडीने महिलेला माहिती देत आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत पलंग, गॅस शेगडी, लाकडी कपाट, पाण्याची मशीन, प्लास्टिकच्या वस्तूंसह जवळपास सर्वच संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. या आगीत अंदाजे ४५ ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून सुमारे २५ ते ३० हजार रुपयांची रोकडही जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला नाही; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले.

घटनास्थळी तहसीलदार फरतारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी शैलेश इंगळे, कोतवाल नारायण घाटोळ तसेच पंच म्हणून श्यामलाल लोथ, गजानन करंजकर आदी उपस्थित होते. पंचनामा करण्यात आला.दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित महिलेला २० हजार रुपयांची मदत केली, तर तहसीलदारांनी ५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली. याशिवाय गावकऱ्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकवर्गणी गोळा करून मदतीचा हात पुढे केला जात आहे.  यावेळी गजानन आप्पा करंजकर – ₹५००, विलास भाऊ नांदेकर – ₹५००, सुश्रुतभाऊ भुस्कुटे – ₹१०००, निलेश राजेंद्र ताकवाले – ₹५००, संतोष कावनपुरे – ₹५००, रामभाऊ नारगुंडे – ₹१०००, सुनिलभाऊ देशपांडे – ₹२००, अक्षय पाळेकर – ₹१०००, रणजीत अहिर – ₹१०००, अनंता काळे – ₹५००, रोहिदास जाधव – ₹१००, कृष्णा नानोटी सर – ₹५००, विवेक रामलाल हांडे – ₹५००, प्रदीप भास्कर मानकर – ₹१०००, बोंदीराम जानू राठोड – ₹२००, डॉ. निलेश घाटोळ – ₹५०० आदींनी आपआपल्या परीने मदत केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पीडित महिलेला शासनाकडून अधिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top