Mahabreaking

[breaking_news]

Sanitation workers :“सफाई कामगार हे नगरपालिकांचा कणा”; प्रश्न सोडविण्यासाठी अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे निर्देश

Sanitation workers : जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये कार्यरत सफाई कामगार हे नगरपालिकांचा कणा असून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी गुरुवारी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिले. सफाई कामगारांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी ते यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

Sanitation workers

यवतमाळ  : जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये कार्यरत सफाई कामगार हे नगरपालिकांचा कणा असून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी गुरुवारी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिले. सफाई कामगारांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी ते यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच सफाई कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत मागील बैठकीच्या इतिवृत्ताचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी सफाई कामगारांना ग्रॅच्युईटी व सातव्या वेतन आयोगाची रक्कम तत्काळ देणे, व्यपगत पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणे, सेवा पुस्तके ३० दिवसांत अद्ययावत करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आस्थापनाविषयक कामे गांभीर्याने पूर्ण करणे, आयुष्मान कार्डासाठी विशेष शिबिरे आयोजित करणे तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सफाई मित्र’ पुरस्कार देण्याचे निर्देश दिले.बैठकीनंतर अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई कामगारांसोबत संवाद साधत त्यांच्या विविध समस्या व मागण्यांवर चर्चा केली. सफाई कामगारांच्या कल्याणासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top