Mahabreaking

🔴 BREAKING
Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती Mecca-Medina :मक्का-मदिनाहून परतला 50 जणांचा ताफा;   नागरिकांकडून जल्लोषात स्वागत Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती Mecca-Medina :मक्का-मदिनाहून परतला 50 जणांचा ताफा;   नागरिकांकडून जल्लोषात स्वागत Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश

Sampornata Abhiyan :झरी जामणीत ‘संपूर्णता अभियान 2.0’ ला प्रारंभ; आमदार संजय देरकर यांच्या हस्ते उद्घाटन

Sampornata Abhiyan : निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत झरी जामणी येथे “संपूर्णता अभियान 2.0” चा शुभारंभ आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पंचायत समितीच्या मुख्य सभागृहात पार पडला. कार्यक्रमास तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचे सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत विकास अधिकारी तसेच विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sampornata Abhiyan

यवतमाळ  : निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत झरी जामणी येथे “संपूर्णता अभियान 2.0” चा शुभारंभ आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पंचायत समितीच्या मुख्य सभागृहात पार पडला. कार्यक्रमास तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचे सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत विकास अधिकारी तसेच विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२८ जानेवारी ते १४ एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत महिला व बालविकास, पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागांनी समन्वयाने कार्य करून निश्चित दर्शकांमध्ये १०० टक्के संपृक्तता साध्य करण्याचे आवाहन आमदार देरकर यांनी केले. महिला व बालविकास विभागांतर्गत ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील पूरक आहार घेणारी मुले, अंगणवाडीतील नोंदणीकृत मुलांची मोजमाप कार्यक्षमता, कार्यरत शौचालय असलेली अंगणवाडी केंद्रे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेली केंद्रे हे महत्त्वाचे दर्शक निश्चित करण्यात आले आहेत.

शिक्षण विभागांतर्गत मुलींसाठी स्वतंत्र व पुरेशा शौचालय सुविधांसह शाळा हा दर्शक ठरविण्यात आला असून, पशुसंवर्धन विभागांतर्गत लसीकरण झालेल्या गोवंशीय जनावरांची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून निर्धारित कालावधीत शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करावी, असेही आमदार देरकर यांनी नमूद केले.

आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा उद्देश मागासलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण व जलद विकास साधणे हा असून आरोग्य, पोषण, शिक्षण, शेती, सामाजिक विकास आणि मूलभूत सुविधांमध्ये ठोस सुधारणा घडवून आणणे हे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा व तालुका प्रशासनाने एकत्रितपणे कार्य करून विकासाची गती वाढवावी, असे आवाहन करत उपस्थितांना “संपूर्णता अभियान 2.0” ची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमास झरी जामणीचे तहसीलदार अक्षय रासने, गटविकास अधिकारी र.वि. सांगळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनीता भगत, गट शिक्षणाधिकारी निलेश खेरनार, तालुका पशुसंवर्धन अधिकारी जगताप, आकांक्षित तालुका कार्यक्रम फेलो अनिल नरवाडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top