Mahabreaking

[breaking_news]

The risk of dilapidated school :जिर्ण शाळा खोल्यांचा धोका होणार कमी; देऊळगाव राजात २० वर्गखोल्यांच्या निर्लेखनास मंजुरी

The risk of dilapidated school : तालुक्यातील जिर्ण व धोकादायक अवस्थेतील शाळा वर्गखोल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या शाळा खोली निर्लेखन मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या टप्प्यात धोत्रा नंदाई (५), कुंभारी (२), पांगरी (२), गोळेगाव (३) आणि भिवंगाव (८) येथील एकूण २० वर्गखोल्यांच्या निर्लेखनास मान्यता देण्यात आली आहे.

The risk of dilapidated schoo

गजानन तिडके

देऊळगाव राजा  : तालुक्यातील जिर्ण व धोकादायक अवस्थेतील शाळा वर्गखोल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या शाळा खोली निर्लेखन मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या टप्प्यात धोत्रा नंदाई (५), कुंभारी (२), पांगरी (२), गोळेगाव (३) आणि भिवंगाव (८) येथील एकूण २० वर्गखोल्यांच्या निर्लेखनास मान्यता देण्यात आली आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश जिर्ण, पडझडीच्या अवस्थेतील व विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणाऱ्या वर्गखोल्या निष्क्रिय करून संभाव्य अपघात टाळणे हा आहे. अनेक शाळांमध्ये भिंतींना तडे जाणे, छत गळणे आणि बांधकाम कमकुवत होणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि शैक्षणिक वातावरण अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली आहे.

यासोबतच शाळांची भौतिक सुविधा सुधारून शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागातील शाळांना आधुनिक स्वरूप देणे हा या मोहिमेचा व्यापक उद्देश आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास असलेला धोका कमी होणार असून सुरक्षित व सुसज्ज शैक्षणिक वातावरण निर्माण होणार आहे. तसेच नवीन वर्गखोल्या उभारण्यासाठी मार्ग मोकळा होईल, शाळांची गुणवत्ता व आकर्षकता वाढेल, पालक व ग्रामस्थांचा शाळेवरील विश्वास दृढ होईल आणि दीर्घकालीन दृष्टीने देखभाल खर्चातही बचत होईल.

गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या हिताला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे दिसून येते. या निर्णयाचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले असून पुढील टप्प्यात आणखी जिर्ण वर्गखोल्यांचे निर्लेखन करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मोहीम यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, शिक्षण विस्तार अधिकारी बबनराव कुमठे तसेच शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. तालुक्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top