Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Budget session : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून; ६ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

Budget session : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ या कालावधीत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडण्यात येणार आहे.

Budget session

मुंबई : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ या कालावधीत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडण्यात येणार आहे.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोहे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

अधिवेशन काळात शनिवार, २८ फेब्रुवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशीही विधिमंडळाचे कामकाज चालू राहणार आहे. मात्र सोमवार, २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. तसेच १९ मार्च रोजी गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी कामकाज होणार नसून २० मार्च रोजीही विधिमंडळाची बैठक होणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top