Mahabreaking

🔴 BREAKING
Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी

Assault after requesting :माहिती अधिकार मागितल्यावर मारहाण; ग्रामसेवक-शिपायाला नुकसानभरपाईचा आदेश

Assault after requesting : पिंपरी माळी येथील राजीव महादेव इंगळे यांनी माहिती अधिकारातून मागितलेली माहिती न दिल्याने ग्रामसेवक व शिपाई यांनी त्यांच्यावर मारहाण केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना फिर्यादीस प्रत्येकी ७,५०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा तसेच एक वर्ष चांगली वर्तणूक ठेवण्याचा आदेश दिला.

Assault after requesting

मेहकर : पिंपरी माळी येथील राजीव महादेव इंगळे यांनी माहिती अधिकारातून मागितलेली माहिती न दिल्याने ग्रामसेवक व शिपाई यांनी त्यांच्यावर मारहाण केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना फिर्यादीस प्रत्येकी ७,५०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा तसेच एक वर्ष चांगली वर्तणूक ठेवण्याचा आदेश दिला.

फिर्यादी राजीव इंगळे यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ग्रामपंचायत पिंपरी माळी येथे सिमेंट रस्ता व घरकुलांच्या बांधकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितली होती. याबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेल्यानंतर ग्रामसेवक भगवान काळे व शिपाई संतोष गोपाळा इंगळे यांनी लाठ्याकाठ्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

तब्बल तेरा वर्षांनंतर या घटनेचा निकाल लागला. सरकारी वकील संतोष मूलचंद खात्री यांनी युक्तिवाद केला. भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र तांबे यांनी आरोपी भगवान काळे व संतोष गोपाळा इंगळे यांना फिर्यादीस प्रत्येकी ७,५०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश देत एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड लिहून घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top