Mahabreaking

🔴 BREAKING
Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह

Substandard jowar : डोणगाव येथे राशन दुकानातून निकृष्ट ज्वारी वाटप; कारवाईची मागणी

  1. Substandard jowar: मागील दोन महिन्यांपासून डोणगाव गोदामातून निकृष्ट धान्याचे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गोदाम पालक व पुरवठा विभागाच्या मुकसंमतीमुळे राशनकार्डधारकांना निकृष्ट धान्य दिले जात असल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर संबंधित धान्याचा साठा गोदामातून परत पाठविण्यात आला असून लवकरच चांगल्या प्रतीचा राशन माल देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Jwar

डोणगाव : मागील दोन महिन्यांपासून डोणगाव गोदामातून निकृष्ट धान्याचे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गोदाम पालक व पुरवठा विभागाच्या मुकसंमतीमुळे राशनकार्डधारकांना निकृष्ट धान्य दिले जात असल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर संबंधित धान्याचा साठा गोदामातून परत पाठविण्यात आला असून लवकरच चांगल्या प्रतीचा राशन माल देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र महिनाभर उलटून गेल्यानंतर पुरवठा विभागाने डोणगाव गोदामावर पाठविलेली ज्वारीही निकृष्ट दर्जाची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात बोंडे व धूळ आढळत असून जानेवारी महिन्याचा माल फेब्रुवारीत वाटप केला जात असल्याचीही नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाच्या धान्यामुळे सर्वसामान्य व गरिबांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

निकृष्ट धान्य उतरवून घेणाऱ्या गोदाम पालकांवर तसेच मालाचे निरीक्षण करणाऱ्या पुरवठा निरीक्षकांवर तातडीने कारवाई करावी, तसेच राशनकार्डधारकांना चालू महिन्यात चांगल्या प्रतीची ज्वारी व तांदूळ त्वरित उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top