Mahabreaking

🔴 BREAKING
Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह

Sant Gajanan Maharaj :साखरखेर्ड्यात संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात

Sant Gajanan Maharaj : येथे श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन शिक्षक कॉलनीतील मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांदरम्यान पालखी मिरवणूक, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद वितरणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

Sant Gajanan Maharaj

पालखी मिरवणूक, कीर्तन व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

साखरखेर्डा : येथे श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन शिक्षक कॉलनीतील मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांदरम्यान पालखी मिरवणूक, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद वितरणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. त्रिवेणीताई देशमुख यांनी “परोपकार, सदाचार व पुण्यकर्म यांमुळे जीवनात आनंद प्राप्त होतो,” असा महत्त्वपूर्ण संदेश भाविकांना दिला. या कीर्तनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित प्रकटदिन सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्रींच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरण करून सोहळ्याची भावपूर्ण सांगता करण्यात आली.

या प्रसंगी पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती वेदांताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, रोकडोबा महाराज मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज चिंचोलकर, युवा नेते योगेश जाधव, ठाणेदार गजानन करेवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, सरपंच ज्योती अमित जाधव, चिखली अर्बन बँकेचे संचालक अशोकराव पाटील, ह.भ.प. पंजाबराव महाराज बिलारी, माजी प्राचार्य मधुकर भगत, माजी मुख्याध्यापक रमेश ठोसरे, बबनराव माळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

काल्याच्या कीर्तनानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात कॉलनीत मिरवणूक काढण्यात आली. मंदिराजवळ श्रींच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी नगरातही प्रकटदिन सोहळा साजरा करण्यात आला. येथे राजू महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले व मिरवणुकीनंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top