Mahabreaking

🔴 BREAKING
Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह

The birth anniversary of Shri  :मासरुळ येथे श्रींचा प्रकटदिन उत्साहात; पालखी सोहळा, हरिनाम सप्ताह व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

The birth anniversary of Shri  : श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त मासरुळ येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण पार पडले. तसेच ६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. अजबराव महाराज मिरगे, ७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. संतोष महाराज आढावणे पाटील यांचे कीर्तन, तर ८ फेब्रुवारी रोजी सांप्रदायिक भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

The birth anniversary of Shri 

पंडीत सावळे 

मासरुळ : श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त मासरुळ येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण पार पडले. तसेच ६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. अजबराव महाराज मिरगे, ७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. संतोष महाराज आढावणे पाटील यांचे कीर्तन, तर ८ फेब्रुवारी रोजी सांप्रदायिक भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

प्रकटदिनाच्या दिवशी सकाळी सात वाजता आरती करून गावातून भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. चौकाचौकांत रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. दिंडीत बालगोपाल वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. महिला भजनी मंडळ, शिव भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांनी भारूड, भजन आणि फुगडीच्या माध्यमातून भक्तिरसाचा आनंद लुटला.

शेगावचे श्री संत गजानन महाराज हे महान संत म्हणून ओळखले जातात. दत्तसंप्रदायातील योगी म्हणून त्यांना मानले जाते. फेब्रुवारी १८७८ मध्ये ते विदर्भातील शेगाव येथे दिगंबर अवस्थेत प्रथम भक्तांना दर्शनास आले. सेवाभाव, साधेपणा आणि भक्तिमार्गाचा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला. “गण गण गणात बोते” हा मंत्र जगाला देणाऱ्या या महान संतांचा प्रकटदिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मासरुळ येथील उत्सव यशस्वी होण्यासाठी गजानन महाराज सेवा समिती व समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top