Mahabreaking

🔴 BREAKING
Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह One-Day National Conference :डॉ. सिन्हा महाविद्यालयात भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात  all crops are plagued by disease :यंदा सर्वच पिकांवर रोगराई, देशाचा राजा कायम पण तणावात राहणार Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह One-Day National Conference :डॉ. सिन्हा महाविद्यालयात भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात  all crops are plagued by disease :यंदा सर्वच पिकांवर रोगराई, देशाचा राजा कायम पण तणावात राहणार

robbery case solved :देऊळगाव राजा बायपासवरील लूटप्रकरणाचा उलगडा : पाच आरोपी ताब्यात, मुद्देमाल जप्त

robbery case solved : बायपास रोड परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकी अडवून मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत छडा लावत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून लुटलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) व श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

robbery case solved
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई : . तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे केली अटक

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : बायपास रोड परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकी अडवून मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत छडा लावत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून लुटलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) व श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
फिर्यादी सूर्यकांत दिनकर सरोदे (वय 25, रा. पापळ, ता. जाफ्राबाद, जि. जालना) हे 25 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मित्रासह जात असताना सातेफळ चौफुलीजवळील ताईची हॉटेल परिसरात दोन मोटारसायकलींवर आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर आरोपींनी शर्टच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत 12 हजार रुपये) व पँटच्या खिशातील 1,500 रुपये रोख रक्कम, तसेच कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेत पळ काढला. घटनेनंतर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे देऊळगाव राजा येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये विशाल सुरेश शेळके (वय 22, रा. अमृत नगर), भावेश दिलीप कासारे (वय 23, रा. जुना जालना रोड), आदित्य उर्फ छोट्या सुभाष पाखरे (वय 21, रा. आंबेडकर नगर), बादल भगवान घुगे (वय 28, रा. दुर्गापुरा) आणि रितेश घुगे (वय 22, रा. भगवान बाबा नगर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पोलीस ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, हेड कॉन्स्टेबल राजू आडवे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज खरडे, ऋषिकेश खंडेराव तसेच तपासी अधिकारी पोउपनि राजकुमार कांबळे यांच्या पथकाने केली.पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.दरम्यान, आरोपींना देऊळगाव राजा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top