Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Jewelry stolen :बसप्रवासात दोन महिलांकडून दागिने लंपास; देऊळगाव राजात २ लाखांची चोरी

Jewelry stolen : बसप्रवासादरम्यान पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा–देऊळगाव मही मार्गावर घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अज्ञात महिलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Jewelry stolen

देऊळगाव राजा : बसप्रवासादरम्यान पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा–देऊळगाव मही मार्गावर घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अज्ञात महिलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फैमीना बी सत्तार नुरमोहम्मद (वय ५५, रा. संजयनगर, देऊळगाव राजा) या ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.१५ ते दुपारी १२ या दरम्यान देऊळगाव राजाहून चिखलीकडे बसने प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दोन अज्ञात महिलांनी चोरून नेले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १९० मण्यांची सुमारे ३ तोळे वजनाची सोन्याची पोत (किंमत अंदाजे ७५ हजार रुपये) तसेच १७ नग गोल डब्यांच्या पुतळ्यांसह सुमारे ५ तोळे वजनाचे दागिने (किंमत अंदाजे १ लाख २५ हजार रुपये) यांचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ६२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार नारायण गिते यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी ब्रम्हा गिरी व मिंड यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, बसप्रवासादरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अशा प्रकारच्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top