Mahabreaking

[breaking_news]

Republic Day :बार्शीटाकळी तालुक्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day : तालुक्यात २६ जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Republic Day

बार्शीटाकळी : तालुक्यात २६ जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये तसेच कॉन्व्हेंट शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहसंमेलने आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी नृत्य, कला, नाटिका, संभाषण कौशल्य सादरीकरणातून आपली प्रतिभा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबा येथे मुख्याध्यापिका सुषमा शेवलकर, लोहगड येथे मुख्याध्यापक गोपाल वाकोडे, चोहोगाव येथे मुख्याध्यापक दयाराम वजीरे, सायखेड येथे मुख्याध्यापक डाखोरे, छावणी येथे मुख्याध्यापक संघदास वानखडे, खडकी येथे मुख्याध्यापिका नीतू कराळे, जामवसु येथे मुख्याध्यापिका छाया सोनोने, मांडोली येथे मुख्याध्यापक केशव घुगे, मुंगसाजी नगर येथे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक योगेश राऊत, बोरमळी येथे मुख्याध्यापक केशव मुसळे, शेलगाव येथे मुख्याध्यापक शिवाजी घुगे, चेलका गाव येथे मुख्याध्यापिका शारदा मारवाल, धानोरा येथे मुख्याध्यापक अमोल सराफ, वरखेड येथे मुख्याध्यापक शिवशंकर गिर्हे, किनखेड येथे मुख्याध्यापक गोपाल काळे, देवदरी येथे मुख्याध्यापक संतोष डाबेराव, चिंचोली देव येथे मुख्याध्यापक रघुनाथ चव्हाण, कोथळी बुद्रुक येथे मुख्याध्यापक योगेश कोहर, जांभरून येथे मुख्याध्यापक भगवान चव्हाण, कोथळी खुर्द येथे मुख्याध्यापिका प्रतिभा ढवळे, फेट्रा येथे मुख्याध्यापिका गीता गायकवाड, हलदोली येथे मुख्याध्यापक दिलीप शेळके, धोतरखेड येथे मुख्याध्यापक गोपाल लोखंडे, चेलका तांडा येथे मुख्याध्यापक प्रवीण पुंडे, राजनखेड तांडा येथे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक राजेश पातळे, जनुना पुनर्वसन येथे मुख्याध्यापक मिठू गोदमले, मिर्झापूर येथे मुख्याध्यापक राजेश कराळे, मांगुळ येथे मुख्याध्यापक राजेश कोहर, निंबी कोस येथे मुख्याध्यापक संतोष बोबडे, राजनखेड गाव येथे मुख्याध्यापिका सविता शेवतकर, सकनी येथे मुख्याध्यापक बिरसिंग डाबेराव, सिद्धेश्वर विद्यालय धाबा येथे मुख्याध्यापक नितीन मानके, सिद्धेश्वर आश्रम शाळा येथे मुख्याध्यापक गणेश शिंदे, वसराम नाईक आडे उच्च माध्यमिक आश्रम शाळा साखरविरा येथे प्राचार्य अनिल धोत्रे, विजाभज प्राथमिक आश्रम शाळा साखरविरा येथे मुख्याध्यापक रामेश्वर गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध शाळांमध्ये स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

याशिवाय धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस चौकी, ३३ के.व्ही. महावितरण केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भारतीय स्टेट बँक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top