Mahabreaking

[breaking_news]

The Labour Department :150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल

The Labour Department : राज्य शासनाने शासकीय विभाग, संचालकालये, आयुक्तालये तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात 3 हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या गटात कामगार विभागाने 200 पैकी 185 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीत कामगार विभागाला स्थान मिळाले आहे.

The Labour Department

कामगार मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांचा सत्कार; कामगिरीचे कौतुक

मुंबई : राज्य शासनाने शासकीय विभाग, संचालकालये, आयुक्तालये तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात 3 हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या गटात कामगार विभागाने 200 पैकी 185 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीत कामगार विभागाला स्थान मिळाले आहे.

कार्यालयीन मूल्यमापनात 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत राज्यातील 68 सर्वोत्तम आयुक्त व संचालक प्रकारात कामगार विभागाअंतर्गत कार्यरत बाष्पके संचालनालयाने चौथा, तर कामगार आयुक्तालयाने पाचवा क्रमांक मिळविला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आपल्या दालनात विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी अधिकाऱ्यांनीही विभागप्रमुख म्हणून कामगार मंत्र्यांचा सत्कार केला.

या प्रसंगी कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव रोशनी कदम, बाष्पके संचालनालयाचे संचालक गजानन वानखडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top