Mahabreaking

[breaking_news]

District Journalists’ Association : प्रजासत्ताक दिनी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ सन्मानित; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान 

District Journalists’ Association : समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

District Journalists' Association

बुलढाणा : समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने सन २०२५–२६ या कालावधीत पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसह समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात अनेक कौतुकास्पद उपक्रम राबविले आहेत. या सामाजिक योगदानाची दखल घेत प्रशासनातर्फे संघाचा सन्मान करण्यात आला.तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत बुलढाणा जिल्हा नशामुक्त व्हावा, यासाठी नशामुक्ती विषयक विशेष जनजागृती व सामाजिक कार्य केल्याबद्दलही बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांच्यासह वरिष्ठ पत्रकार नितीन शिरसाट, चंद्रकांत बर्दे, राजेश डिडोळकर, युवराज वाघ, विलास खंडेराव, संतोष लोखंडे, सुनिल मोरे, अजय राजगुरे, मृणाल सावळे, रहमत अली आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top