Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Ganesh Jayanti celebrations :देऊळगाव राजात श्री मयुरेश्वर त्रिदिवसीय गणेश जयंती सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सांगता

Ganesh Jayanti celebrations : शहरातील पुरातन श्री मयुरेश्वर गणपती मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला त्रिदिवसीय गणेश जयंती सोहळा, गणेश याग व किर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहाने पार पडला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Ganesh Jayanti

देऊळगाव राजा : शहरातील पुरातन श्री मयुरेश्वर गणपती मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला त्रिदिवसीय गणेश जयंती सोहळा, गणेश याग व किर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहाने पार पडला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

श्री मयुरेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दि. २१ ते २३ जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत ध्वजपूजन, मंडप पच्छादन, गणपती सहस्रावर्तन, अभिषेक, गणेश याग, महाआरती, हरिपाठ व हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

या सोहळ्यात ह.भ.प. संजय महाराज गायकवाड व ह.भ.प. कार्तिक महाराज घाडगे यांची दोन दिवस कीर्तने झाली. तसेच काल्याचे किर्तन ह.भ.प. संत चरणदास निकम महाराज यांनी सादर केले. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रोहिदास बोराटे यांच्या हस्ते संपत्ती महाआरती करण्यात आली. हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या त्रिदिवसीय सोहळ्यास आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्षा माधुरीताई शिंपणे, उपनगराध्यक्षा वनिताताई भुतडा, गटनेते प्रदीप वाघ, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, गोविंदराव झोरे तसेच नगरसेवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी व देऊळगाव राजा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वारकरी, टाळकरी, भजनी मंडळ तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते.

श्री मयुरेश्वर गणेश जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी मयुरेश्वर मित्र मंडळ व महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top