Mahabreaking

[breaking_news]

A burglary occurred in broad : देऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घरफोडी, सोने–चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास

A burglary occurred in broad : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक उघडकीस आली आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश केला. तसेच लोखंडी पेटीचा कोंडा वाकवून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७४ हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला. सदर मुद्देमालाची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत जवळपास चार लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.

A burglary occurred

मेहकर : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक उघडकीस आली आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश केला. तसेच लोखंडी पेटीचा कोंडा वाकवून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७४ हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला. सदर मुद्देमालाची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत जवळपास चार लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध २० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ञ व श्वान पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले आहे.
देऊळगाव साखरशा येथील सुरेश रामचंद्र नवत्रे (वय ५५) यांच्या घरात ही चोरी झाली. फिर्यादी नवत्रे हे घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराची खिडकी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर पेटीचा कोंडा वाकवून सोन्याची अंगठी (३ ग्रॅम ९७० मिली, किंमत ₹१०,१६०), सोन्याची एकदाणी (४० मणी) (२० ग्रॅम १९० मिली, किंमत ₹४३,१६०), चांदीचे कडे (२०० ग्रॅम ४६० मिली, किंमत ₹१०,८३०) तसेच रोख ₹१०,००० असा एकूण ₹७४,१५० रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून जानेफळ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोका लक्ष्मण पिटकर करीत आहेत.
दरम्यान, चोरीची माहिती मिळताच काही तासांतच बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयातील श्वान पथक (सोनोंणे, ईरफानभाई व कर्मचारी) घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच ठसे तज्ञांनीही घटनास्थळी तपास केला. ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. चोरीचा कसून तपास सुरू असून आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील, असा विश्वास ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top