The 2026 MLA Cup cricket : येथील साई सरकार क्रिकेट क्लबच्या वतीने २०२६ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे खुले सामने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आज दि. 17 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : येथील साई सरकार क्रिकेट क्लबच्या वतीने २०२६ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे खुले सामने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आज दि. 17 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

उद्घाटनप्रसंगी आमदार मनोज भाऊ कांयदे यांचे बंधू सतीश भाऊ कांयदे, नगरपरिषद देऊळगाव राजा येथील गटनेते प्रदीप उर्फ छोटू भाऊ, साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, बीबी पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत पाटील, मांडवा येथील सरपंच राजेभाऊ कुहीटे, बीबीचे उपसरपंच भास्कर भाऊ खुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेची सुरुवात साई सरकार सैलानी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. ही स्पर्धा साई सरकार क्रिकेट ग्राउंड अकॅडमी, दुसरा बीड फाटा, मलकापूर पांगरा येथे आयोजित करण्यात आली असून उद्घाटनप्रसंगी हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
२०२६ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम बक्षीस : ५१,००० रुपये,द्वितीय बक्षीस : ३१,००० रुपये, तृतीय बक्षीस : २१,००० रुपये असे आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्कृष्ट खेळाडूंना सायकल, शूज, तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी २,१०० रुपये अशी विविध पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
यावेळी ठाणेदार गजानन करेवाड, एपीआय चंद्रकांत पाटील तसेच राजेश भाऊ कांयदे यांनी क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, जातीय बंधुभाव, आपुलकी व उत्साह निर्माण होतो, असे मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी साई सरकार क्रिकेट क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करत स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. दि. १७ जानेवारीपासून सुरू झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. २८ जानेवारी रोजी आमदार मनोज भाऊ कांयदे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

