Mahabreaking

[breaking_news]

Vanchit Bahujan Aghadi :पक्षनिष्ठेला मान : वंचित बहुजन आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे निलंबन अखेर मागे

Vanchit Bahujan Aghadi : लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. काही जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या गावांमध्ये अपेक्षेप्रमाणे मतदान न झाल्याने कार्यकर्त्यांनी संघटनात्मक भूमिकेतून जाब विचारला. मात्र, या भूमिकेकडे पक्षशिस्तीचा भंग म्हणून पाहत वंचित बहुजन आघाडीने काही कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.या कार्यकर्त्यांचे निलंबन पक्षाने मागे घेतले आहे. त्यामुळे, त्याचा फायदा पक्षाला महानगर पालिका निवडणुकीत होणार आहे.

vanchit bahujan aghadi

अकोला : लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. काही जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या गावांमध्ये अपेक्षेप्रमाणे मतदान न झाल्याने कार्यकर्त्यांनी संघटनात्मक भूमिकेतून जाब विचारला. मात्र, या भूमिकेकडे पक्षशिस्तीचा भंग म्हणून पाहत वंचित बहुजन आघाडीने काही कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.या कार्यकर्त्यांचे निलंबन पक्षाने मागे घेतले आहे. त्यामुळे, त्याचा फायदा पक्षाला महानगर पालिका निवडणुकीत होणार आहे.

या कारवाईत जीवन डिगे (लहान उमरी), शरद इंगोले (जठार पेठ), सतीश जंजाळ (मोठी उमरी), आकाश वाहुरवाघ (मोठी उमरी), संतोष गवई (डॉ. आंबेडकर नगर), अमोल तिरपुडे (जठार पेठ) व उमेश गायकवाड (डॉ. आंबेडकर नगर) या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

महत्त्वाची बाब म्हणजे, निलंबनाच्या कालावधीतही या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाविषयीची आपली निष्ठा अबाधित ठेवत संघटन बांधणीसाठी काम सुरूच ठेवले. पक्षवाढ, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि तळागाळातील संपर्क कायम राखण्यात त्यांनी सकारात्मक भूमिका बजावली.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची पक्षाशी असलेली निष्ठा, संघटनात्मक योगदान आणि बांधिलकी लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या आदेशाने संबंधित सर्व कार्यकर्त्यांचे निलंबन अधिकृतपणे मागे घेण्यात आले आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पक्षसंघटन अधिक बळकट करणारा ठरणार असून, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. याचा थेट फायदा वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top