Mahabreaking

[breaking_news]

The final voters’ list :शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; जिल्ह्यात ५ हजार ३७९ मतदारांचा समावेश

The final voters’ list : महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाची अकोला जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण ५ हजार ३७९ मतदारांचा समावेश आहे.

voters' list

अकोला : महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाची अकोला जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण ५ हजार ३७९ मतदारांचा समावेश आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर मतदार यादी तयार करण्याच्या सुधारित वेळापत्रकानुसार ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारूप यादीत एकूण ४ हजार ८८३ मतदारांचा समावेश होता.

मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार ३ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत अकोला जिल्ह्यात पदनिर्देशित अधिकारी तसेच तहसीलदार स्तरावर प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम यादीत एकूण ५ हजार ३७९ मतदारांचा समावेश आहे.

अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी सुधारित वेळापत्रकानुसार सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची कार्यालये, तसेच तहसीलदार व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयांमार्फत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मतदार यादी नागरिकांना कार्यालयीन वेळेत अवलोकनासाठी उपलब्ध आहे. तसेच अंतिम मतदार यादी अकोला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर (अकोला डॉट जीओव्ही डॉट इन) मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

इच्छुक मतदारांना नोंदणीची संधी

मतदार नोंदणी प्रक्रियेत अद्याप पात्र शिक्षकांचे नाव नोंदविले गेले नसल्यास किंवा इच्छुक असल्यास, निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये मतदार नोंदणी करता येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top