Mahabreaking

🔴 BREAKING
The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष

Revenue services : महसूल सेवा आता थेट नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर !

Revenue services : शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता, वेग आणि सुलभता आणण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘डिजिटल क्रांती’कडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ हा व्हॉट्सअॅप आधारित नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.

Revenue services

जिल्हाधिकारी कार्यालयाची ‘महसूल मित्र-सुलभ चॅटबॉट सेवा’ कार्यान्वित

बुलढाणा  : शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता, वेग आणि सुलभता आणण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘डिजिटल क्रांती’कडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ हा व्हॉट्सअॅप आधारित नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.

नागरिकांना आता ९४२३१८४८०४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून घरबसल्या महसूल विभागाशी संपर्क साधता येणार आहे. हा चॅटबॉट मराठी व इंग्रजी भाषांमध्ये २४x७ उपलब्ध असून विविध महसूल सेवांची माहिती एका क्लिकवर मिळण्यास मदत होणार आहे.

सुलभ चॅटबॉटद्वारे उपलब्ध प्रमुख सेवा

सेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा: जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयांतील सेतू सेवांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती.

सहज प्रणाली: जुने महसूल अभिलेख व दस्तऐवज तत्काळ पाहण्याची सुविधा.

प्रतिसाद प्रणाली: नागरिकांच्या महसूलविषयक ऑनलाइन तक्रारींची निवारण यंत्रणा.

‘महसूल मित्राशी बोला’ : वारंवार विचारल्या जाणाऱ्या शेतीविषयक कायदे, नियम, जमिनीचे रेकॉर्ड आदींबाबत एआयद्वारे उत्तरे.

आधार केंद्र शोध: जवळचे आधार केंद्र सहज शोधण्याची सोय.

बुलढाणा जिल्हा डॅशबोर्ड: जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय व सांख्यिकीय माहिती ग्राफिक्स स्वरूपात पाहण्याची सोय.

एआय आधारित जीआर शोध: महसूल विभागाच्या शासन निर्णयांचा (जीआर) त्वरित शोधण्याची सोय.

अनुदान स्थिती: आधार क्रमांकाच्या आधारे संजय गांधी निराधार योजना अनुदानाची स्थिती पाहण्याची सुविधा.

अर्ज मार्गदर्शन: जिल्हाधिकारी, उपविभागीय व तहसील कार्यालयांतील विविध शाखेतील सेवेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती.

हा प्लॅटफॉर्म अँड्रॉइड, आयओएस आणि संगणकावर पूर्णपणे वापरण्यास सक्षम आहे. यामुळे नागरिकांचा प्रवासाचा खर्च व वेळ वाचणार असून घरबसल्या सेवा मिळतील.

पारदर्शकता : या सुलभ सेवा चॅटबॉट सेवेमुळे नागरिकांना अर्जाची स्थिती आणि तक्रारींचा मागोवा घेणे सहज शक्य होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट’ सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top