Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Victim of illegal mining! : अवैध उत्खननाचा बळी! ट्रॅक्टर उलटल्याने अल्पवयीन चालकाचा मृत्यू

Victim of illegal mining! : डोणगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाच्या काळ्या धंद्याने अखेर एका अल्पवयीन मुलाचा जीव घेतला. ट्रॅक्टर उलटल्याने १७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २ जानेवारीच्या रात्री समोर आली आहे. वाहन चालवण्यास अपात्र असल्याचे माहीत असूनही अल्पवयीनाच्या हाती ट्रॅक्टर देणाऱ्या वाहन मालकाविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश किरण भुतेकर असे मृतकाचे नाव आहे.डोणगावपासून जवळच असलेल्या आरेगाव माळ परिसरात २ जानेवारीच्या रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

Victim of illegal mining!

वाहन ताब्यात देणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल

डोणगाव : डोणगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाच्या काळ्या धंद्याने अखेर एका अल्पवयीन मुलाचा जीव घेतला. ट्रॅक्टर उलटल्याने १७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २ जानेवारीच्या रात्री समोर आली आहे. वाहन चालवण्यास अपात्र असल्याचे माहीत असूनही अल्पवयीनाच्या हाती ट्रॅक्टर देणाऱ्या वाहन मालकाविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश किरण भुतेकर असे मृतकाचे नाव आहे.डोणगावपासून जवळच असलेल्या आरेगाव माळ परिसरात २ जानेवारीच्या रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

एम.एच. २८ टी ८७०९ क्रमांकाचा ट्रॅक्टर भरधाव व निष्काळजीपणे चालवत असताना अल्पवयीन ऋषिकेश किरण भुतेकर (वय १७ वर्षे ७ महिने) याचा ताबा सुटून ट्रॅक्टर रस्त्याखालील नाल्यात कोसळला व पलटी झाला. ट्रॅक्टरखाली दबून ऋषिकेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकरणी दत्ता पुंजाजी भुतेकर (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस स्टेशनने पवन अरुण काळे (रा. डोणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीनाला वाहन चालवता येत नाही, हे माहीत असूनही त्याच्या ताब्यात ट्रॅक्टर देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अवैध उत्खनन माफियांचे ‘रात्रीचे राज्य’
डोणगावमध्ये रात्र झाली की अवैध उत्खनन करणाऱ्यांसाठी जणू दिवस उगवतो, अशी स्थिती आहे. कमी पैशात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा ट्रॅक्टर चालक म्हणून वापर, तर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लोकेशन देण्यासाठी मोटारसायकलवर फिरणारी युवकांची टोळी, असा संपूर्ण साखळीदार प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे, रात्री अपरात्री गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर सर्रास दिसत असताना, रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलीस प्रशासनाला ही वाहने कशी दिसत नाहीत? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महसूल–पोलीस प्रशासनावर संशयाची सुई
मागील काही दिवसांत तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अप्पर तहसीलदार डोणगावमध्ये येतात; मात्र त्यांचा लोकेशन आधीच माफियांपर्यंत पोहोचतो, अशी गंभीर चर्चा आहे. त्यामुळे कारवाईआधीच उत्खनन थांबवले जाते व पुन्हा रात्री सुरू होते, असा आरोप होत आहे.

सखोल चौकशीची मागणी
या अपघातामागे अल्पवयीन चालक एकटाच होता की आणखी ट्रॅक्टर सोबत होते? कोणत्या बांधकामासाठी उत्खनिज नेले जात होते? माफिया साखळी कोण चालवत आहे? याची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. एक अल्पवयीनाचा जीव गेल्यानंतरही जर प्रशासन जागे झाले नाही, तर डोणगावमधील अवैध गौण खनिज माफिया राज आणखी किती बळी घेणार? हा प्रश्न आता थेट जनतेतून विचारला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top