BiBi police raided a gambling : बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवानगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून नगदी रक्कम व मोबाईल फोन असा एकूण ३२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा जुगार अड्डा मराठी प्राथमिक शाळेच्या पाठीमागे सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

रमेश खंडागळे
बीबी : बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवानगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून नगदी रक्कम व मोबाईल फोन असा एकूण ३२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा जुगार अड्डा मराठी प्राथमिक शाळेच्या पाठीमागे सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
देवानगर येथील प्राथमिक मराठी शाळेच्या मागील बाजूस भुमराळा येथील सतीश शंकर बोरुडे, पंडित कुंडलिक मोरे, विश्वनाथ भिकाजी चौधरी, कैलास गुलाब मुळे तसेच देवानगर येथील दत्तू झीपा राठोड हे आरोपी दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी जुगार खेळत असल्याची माहिती बीबी पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका रविराज चव्हाण व पोहेका बद्रीनाथ कायंदे यांनी पंचासमक्ष धाड टाकली. यावेळी आरोपींची अंगझडती घेतली असता विविध कंपन्यांचे मोबाईल फोन (किंमत अंदाजे २८ हजार २०० रुपये) तसेच रोख रक्कम ३ हजार ९८० रुपये असा एकूण ३२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेका रविराज चव्हाण हे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
शाळेच्या परिसरातच जुगार अड्डा सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

