Mahabreaking

[breaking_news]

Asha Karale :दिग्रस बु.च्या सरपंच आशा कराळे यांना ‘उत्कृष्ट सरपंच विदर्भभूषण पुरस्कार २०२५’

Asha Karale : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. या छोट्याशा गावाला आदर्श ग्राम पुरस्कारापर्यंत पोहोचवून विदर्भात गावाचे नाव उज्वल करणाऱ्या कर्तव्यदक्ष सरपंच आशा सुधाकर कराळे यांना ‘उत्कृष्ट सरपंच विदर्भभूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले.

Asha Karale,

राहुल सोनोने 

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. या छोट्याशा गावाला आदर्श ग्राम पुरस्कारापर्यंत पोहोचवून विदर्भात गावाचे नाव उज्वल करणाऱ्या कर्तव्यदक्ष सरपंच आशा सुधाकर कराळे यांना ‘उत्कृष्ट सरपंच विदर्भभूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले.

हा सन्मान विद्याभूषण फाऊंडेशन, नागपूर यांच्या वतीने नागपूर येथील बानाबाई कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक भवन, उर्वेला कॉलनी (वर्धा रोड) येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमोद काळबांडे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी जागतिक कृषी तज्ज्ञ व वर्ल्ड बँकेचे माजी सल्लागार डॉ. रमेश ठाकरे होते. यावेळी डॉ. बबनराव तायवाडे, गेव्ह आवारी, डॉ. प्रदीप आगलावे, प्रमोद मानमोडे, प्रा. प्रतापसिंह चौव्हान आदी मान्यवर उपस्थित होते.

सरपंच आशा कराळे यांनी ग्रामस्वच्छता, पाणीपुरवठा, महिला सबलीकरण, शिक्षण तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत कुटुंबीय उपस्थित होते. या सन्मानामुळे दिग्रस बु. गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top