Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Dinkar Kale :शिंदी येथील तात्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे अखेर निलंबित

Dinkar Kale : सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत मौजे शिंदी येथील तात्कालीन ग्रामसेवक दिनकर सिताराम काळे यांना आज २ जानेवारी २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिंदखेडराजा (वर्ग–१) अजितकुमार बांगर यांनी निलंबित केले आहे. ग्रामपंचायत कारभारातील गंभीर अनियमितता, पदाचा गैरवापर व गैरवर्तणुकीच्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

Dinkar Kale,

साखरखेर्डा : सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत मौजे शिंदी येथील तात्कालीन ग्रामसेवक दिनकर सिताराम काळे यांना आज २ जानेवारी २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिंदखेडराजा (वर्ग–१) अजितकुमार बांगर यांनी निलंबित केले आहे. ग्रामपंचायत कारभारातील गंभीर अनियमितता, पदाचा गैरवापर व गैरवर्तणुकीच्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

यासंदर्भात शिंदी येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश तुकाराम खरात यांनी ४ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत ग्रामसेवक काळे यांनी ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार करणे, गैरवर्तणूक करणे, महिलांना अपमानास्पद वागणूक देणे, तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता अधिकारांचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या तक्रारीनंतर संबंधित ग्रामसेवकाची तात्काळ तांदुळवाडी येथे बदली करण्यात आली होती. मात्र, बदलीनंतरही फोनद्वारे व गावात येऊन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना धमक्या दिल्याचे आरोप पुढे आले. “माझ्या विरोधात तक्रार कराल तर पाहून घेईन,” अशा धमक्या दिल्यामुळे ग्रामपंचायत कारभारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकास निलंबित करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकारी (पंचायत), सिंदखेडराजा यांनी करून अहवाल सादर केला. चौकशी अहवालात पदाचा गैरवापर, मनमानी कारभार व प्रशासकीय शिस्तभंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ अंतर्गत गटविकास अधिकारी यांनी सदर ग्रामसेवकाला ग्रामपंचायत अधिकारी पदावरून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

निलंबन काळात दिनकर काळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील तरतुदीनुसार कोणताही उद्योग, व्यवसाय अथवा नोकरी करता येणार नाही. तसेच मुख्यालयाबाबतचे स्वतंत्र आदेश जिल्हा परिषद स्तरावरून निर्गमित करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top