Mahabreaking

🔴 BREAKING
Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड

3,200 liters of biodiesel seized: अवैध बायोडिझेल विक्रेत्यांवर एलसीबीची धडक कारवाई ;3,200 लिटर बायोडिझेलसह जप्त 

3,200 liters of biodiesel seized: बायाेडिझेलच्या पंपाची टाकी साफ करताना दाेन युवकांचा गुदरमरून मृत्यू झाल्याची घटना नायगाव फाट्यावर घडली हाेती. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध बायाेडिझेल विकणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन हजार २०० लिटर बायोडिझेलसह इतर साहित्य असा एकूण पाच लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
3,200 liters of biodiesel seized
सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल, ५.८६ लाखांचा एवज केला जप्त
बुलढाणा : बायाेडिझेलच्या पंपाची टाकी साफ करताना दाेन युवकांचा गुदरमरून मृत्यू झाल्याची घटना नायगाव फाट्यावर घडली हाेती. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध बायाेडिझेल विकणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन हजार २०० लिटर बायोडिझेलसह इतर साहित्य असा एकूण पाच लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मलकापूर शहर व दसरखेड एमआयडीसी हद्दीत छापे टाकून ही कारवाई केली.
27 सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलिस ठाणे हद्दीतील धरणगाव शिवारात हॉटेल फौजी धाब्याजवळ बायोडिझेलचा अवैध साठा आढळला. जमिनीत पुरलेल्या लोखंडी टाक्यांमध्ये एक हजार २०० लिटर बायोडिझेल साठवून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या ठिकाणावरून दाेन लाख ६४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला. सय्यद अब्दुला सय्यद याकुब (वय 37, रा. पारपेठ, मलकापूर) आणि शेख इप्रान शेख इस्माईल (रा. वारादरी, मलकापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
 याच दिवशी दसरखेड एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील रनथम शिवारातील हॉटेल एकता समोर अवैध बायोडिझेलचा साठा आढळला. छाप्यात दाेन हजार लिटर बायोडिझेल व इतर साहित्य असा 3,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात इप्रान खान फिरोज खान (रा. उज्जैन, मध्यप्रदेश), लखन पांचाळ (रा. रतलाम, मध्यप्रदेश), शाकीर खान मास्टर (रा. उज्जैन, मध्यप्रदेश), मोहम्मद नईम शेख (रा. जळगाव) व अर्शद तेली (रा. गुजरात) यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. अविनाश जायभाये, पंकज सपकाळे, तसेच पथकातील इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
काळ्या बाजारासाठी जाणारा राशनचा तांदूळ ट्रकसह जप्त
 गरीब व गरजूंना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत मिळणारा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी ट्रकसह मोठा साठा पकडला आहे. या कारवाईत तब्बल ४२ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ सप्टेंबर रोजी केली. पोनि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जळगाव जामोद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घोडेगाव फाट्यावर सापळा रचून ही कारवाई केली.या प्रकरणी भटटी कादर कासम (वय 55, रा. अरवशेरी, माळिया, जि. राजकोट, गुजरात) , वैभव सुनिल आटोळे (वय 25, रा. कुरणगाव, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा), अंकुश केशन आटोळे (वय 22, रा. कुरणगाव, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत हा तांदूळ कुरणगाव येथील विष्णू बाबाराव आटोळे यांच्या गोडाऊनमधून आणल्याचे समोर आले.त्यानंतर गोडाऊनवर छापा टाकण्यात आला असता, तेथून 344 क्विंटल तांदूळ (किंमत 10,32,000 रुपये) तसेच वजन काटे, पोते, शिलाई मशीन आदी साहित्य (किंमत 40,200 रुपये) हस्तगत करण्यात आले.
एकूण ट्रक आणि गोडाऊनमधून 584 क्विंटल तांदूळ (किंमत 17,52,000 रुपये) आणि ट्रक (किंमत 25 लाख रुपये) असा 42,92,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top