Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Give justice: रूपाली व रियांश म्हस्के यांना न्याय द्या!

Give justice: शहरातील शिक्षक कॉलनी येथे झालेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडातील मृतक रूपाली म्हस्के व चार वर्षीय रियांश म्हस्के यांना तात्काळ न्याय मिळावा, तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रूपाली म्हस्के यांच्या नातेवाईकांनी बुधवारी मेहकर पोलीस ठाण्यात जोरदार आक्रोश केला.

Give justice
मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; मेहकर पोलीस ठाण्यात नातलगांचा आक्रोश

मेहकर : शहरातील शिक्षक कॉलनी येथे झालेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडातील मृतक रूपाली म्हस्के व चार वर्षीय रियांश म्हस्के यांना तात्काळ न्याय मिळावा, तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रूपाली म्हस्के यांच्या नातेवाईकांनी बुधवारी मेहकर पोलीस ठाण्यात जोरदार आक्रोश केला.
रविवारी मध्यरात्री आरोपी राहुल म्हस्के याने पत्नी रूपाली म्हस्के व चार वर्षांचा मुलगा रियांश म्हस्के यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मृतक रूपाली यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच तपासादरम्यान अन्य सहआरोपी निष्पन्न झाल्यास त्यांनाही कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी ठाम मागणी नातेवाईकांनी यावेळी केली. पोलीस ठाण्यात नातलगांनी भावना व्यक्त करत संताप व्यक्त केला.
मोळा येथील ग्रामस्थांनी नातेवाईकांची समजूत काढत पोलीस प्रशासन व नातेवाईक यांच्यात संवाद घडवून आणला. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्यानंतर नातेवाईक शांततेत पोलीस ठाण्यातून परतले.

“या प्रकरणाचा तपास प्रथम प्राधान्याने सुरू आहे. तपासाअंती जे दोषी असतील, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तपासामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर ठेवली जाणार नाही.”
— व्यंकटेश्वर आलेवार, ठाणेदार, मेहकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top