Mahabreaking

[breaking_news]

Paramahansa Shri Tejaswi Maharaj’s :परमहंस श्री तेजस्वी महाराजांच्या षोडसी सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

Paramahansa Shri Tejaswi Maharaj’s :तीर्थक्षेत्र वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या षोडसी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी  लाभ घेतला. या वेळी साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

Paramahansa Shri Tejaswi Maharaj
साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या षोडसी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी सहभाग घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. या वेळी साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे दि. १३ डिसेंबर रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी वैकुंठगमन झाले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात त्यांची समाधी मंदिर परिसरात देण्यात आली. या प्रसंगी राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दि. १५ ते २८ डिसेंबर या कालावधीत गजानन गाथा पारायण, विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण, कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. षोडसी सोहळ्याच्या समारोप दिनी, दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी काकडा आरती, त्यानंतर श्री चैतन्यपुरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. कार्यक्रमाच्या शेवटी सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने महापंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top