Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

 Prataprao Jadhav’s car accident: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा समृद्धीवर भीषण अपघात

Prataprao Jadhav’s car accident: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा समृद्धी महामार्गावरील मालेगाव तालुका हद्दीत चॅनल क्रमांक २४४ जवळ २७ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे खासगी स्वीय सहाय्यक, अंगरक्षक (बॉडीगार्ड) यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत.सुदैवाने जाधव हे कारमध्ये नव्हते.

Prataprao Jadhav's car met with a horrific accident

स्वीय सहाय्यक व अंगरक्षकासह तीन जण जखमी

वाशिम : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा समृद्धी महामार्गावरील मालेगाव तालुका हद्दीत चॅनल क्रमांक २४४ जवळ २७ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे खासगी स्वीय सहाय्यक, अंगरक्षक (बॉडीगार्ड) यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत.सुदैवाने जाधव हे कारमध्ये नव्हते.
प्राप्त माहितीनुसार, एमएच २८ बीके ००७७ क्रमांकाची कार नागपूर येथून मेहकरकडे जात असताना मालेगाव तालुक्यातील वारंगी टोलनाक्यापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर कळंबेश्वर गावाच्या हद्दीत अपघात झाला. या अपघातात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे खासगी स्वीय सहाय्यक वैभव देशमुख, त्यांचे अंगरक्षक चोपडे तसेच नीलेश वाकोडे हे जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस राजू सांगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नीलेश वाकोडे यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती राजू सांगळे यांनी दिली.अपघातातील सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. सौरभ भुतडा यांनी दिली. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून वाशिम शहर पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी नोंद घेतली आहे. दरम्यान, मालेगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची कोणतीही नोंद झालेली नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top