Mahabreaking

[breaking_news]

the Buddha statue installation anniversary :चतारी येथे रविवारी बुद्धमुर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवरप्रदान समारंभ

the Buddha statue installation anniversary : पातूर तालुक्यातील चतारी येथे रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी विश्वशांती बुद्धविहारात बुद्धमुर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवरप्रदान समारंभ होणार आहे. या प्रसंगी परिसरातील उपासक–उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

Buddha statue installation
२८ फूट महापरिनिर्वाण बुद्धमूर्ती; २८ डिसेंबर रोजी, २८ तासांत साकारलेले अद्भुत शिल्प

राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील चतारी येथे रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी विश्वशांती बुद्धविहारात बुद्धमुर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवरप्रदान समारंभ होणार आहे. या प्रसंगी परिसरातील उपासक–उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर, कठोर तपश्चर्या, अलौकिक धैर्य व अखंड उद्योगशीलतेतून तथागत भगवान बुद्धांनी समाजाला अंधश्रद्धा, राक्षसी व विध्वंसक रूढींपासून मुक्त करून मानवीकरणाचा मार्ग दाखविला. दुःख व दारिद्र्याच्या चिखलात अडकलेल्या समाजाला त्यांनी करुणा, समता व प्रज्ञेचा प्रकाश दिला. हे आधुनिक भारताच्या इतिहासातील महान पर्व असून मानवस्वातंत्र्याच्या इतिहासातील सुवर्णपान मानले जाते.

विश्वशांती बुद्धविहार, चतारी येथे २८ डिसेंबर २०१६ रोजी जगप्रसिद्ध बुद्धमूर्ती शिल्पकार सुरेशजी खंडेराव (नाशिक) यांच्या संकल्पनेतून २८ फूट लांबीची महापरिनिर्वाण अवस्थेतील भव्य बुद्धमूर्ती अवघ्या २८ तासांत साकारण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्धमुर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवरप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास जेतवन महाबुद्धविहार, नंदुरबार येथील भिक्षुसंघ उपस्थित राहणार आहेत. पू. भदन्त गुणरत्न महाथेरो, पू. भदन्त राजज्योती प्रज्ञागिरी (बुद्धविहार, टेंभुर्णा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पी. जे. वानखडे, विजय हिवराळे, नंदकुमार डोंगरे, राजेश सरकटे, रमेश गवई, गोपाल खंडारे, विद्याताई आकोडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ७ वाजता धम्मध्वजारोहणाने सुरू होणार आहे. त्यानंतर वंदना, परित्राणपाठ, भिक्षुसंघांची धम्मदेसना व चिवरप्रदान आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.

या समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धार्थ नवयुवक मंडळ दिग्रस बु., भीमशक्ती क्रीडा मंडळ बोथाकाजी, शिलवंत तरुण मंडळ पिं. खुटा, आनंद नवयुवक मंडळ वाहळा खु., जेतवन बुद्धविहार समिती, भीमशक्ती क्रीडा मंडळ सुकळी, सिद्धार्थ तरुण मंडळ शहापूर, समता सैनिक दल, महामाया उपासिका संघ, चतारी भीमशक्ती क्रीडा मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी चतारी  यांचे सहकार्य राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top