Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

A minor girl was sexually assaulted : अल्पवयीन मुलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार; दोन्ही आरोपीही अल्पवयीन

A minor girl was sexually assaulted : :किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी तसेच आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत.

A minor girl was sexually assaulted

किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

सिंदखेड राजा :किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी तसेच आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तिला शारीरिक वेदना जाणवू लागल्याने हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

या प्रकरणी २४ डिसेंबर रोजी रात्री ११.१३ वाजता किनगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमे तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक कृत्य करणे, तिच्या शीलभंगास कारणीभूत ठरणे तसेच एकाहून अधिक व्यक्तींचा सहभाग असणे, अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे.

दोन्ही अल्पवयीन आरोपींची सुधारगृहात रवानगी

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बालन्याय अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील प्रक्रिया राबवून आरोपींना बुलढाणा येथील सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. पीडित मुलीची आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, बालकल्याण समितीमार्फत समुपदेशन व संरक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब तसेच इतर आवश्यक पुरावे योग्य व कायदेशीर पद्धतीने संकलित करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top