The lost wallet : वयोमानानुसार कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अशीच एक हृदयस्पर्शी घटना साखरखेर्डा येथे अनुजा ब्युटी पार्लरसमोर घडली असून, समाजात माणुसकी व मातृत्वाची जबाबदारी आजही जिवंत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.एका महिलेचे पडलेले पैशांचे पाकिट अनुजा ढोलेकर यांनी त्यांचा शोध घेवून परत दिले.

साखरखेर्डा : वयोमानानुसार कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अशीच एक हृदयस्पर्शी घटना साखरखेर्डा येथे अनुजा ब्युटी पार्लरसमोर घडली असून, समाजात माणुसकी व मातृत्वाची जबाबदारी आजही जिवंत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.एका महिलेचे पडलेले पैशांचे पाकिट अनुजा ढोलेकर यांनी त्यांचा शोध घेवून परत दिले.
शिंदी येथील सखुबाई जनार्दन मारके या महिला शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता साखरखेर्डा येथे आल्या होत्या. घरकुल मंजूर झाल्याने बांधकाम सुरू असल्यामुळे पैशांची गरज भासल्याने त्यांनी हातातील चांदीच्या पाटल्या सोनाराकडे मोडल्या, त्यातून त्यांना ७ हजार रुपये मिळाले.
बाजार गल्लीतून परत येताना त्या सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कैलास ढोलेकर यांच्या घराजवळ बसल्या. त्यांनी त्यातील ५ हजार रुपये एका पाकिटात ठेवले, तर २ हजार रुपये बाजारखर्चासाठी वेगळे काढले. मात्र पाकीट पिशवीत ठेवताना ते खाली पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही आणि त्या तेथून निघून गेल्या.
काही वेळाने अनुजा ब्युटी पार्लरकडे येणाऱ्या एका महिलेला ते पाकीट दिसले. तिने ते उचलून अनुजा ढोलेकर यांच्याकडे दिले. पाकीट उघडून पाहिल्यानंतर आत ५ हजार रुपये असल्याचे दिसून आले. कोणाचे पैसे असतील, याची सर्वांनाच चिंता लागली.पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी पाणी पिण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेचेच हे पाकीट असावे, असा अंदाज व्यक्त केला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ते पाकीट सखुबाई मारके यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.
सोशल मीडियाच्या मदतीने मालकाचा शोध
मात्र ती महिला नेमकी कोण, याचा शोध घेण्यासाठी कैलास ढोलेकर यांनी संबंधित महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. शिंदी येथील सरपंच अशोक खरात यांनी ती महिला सखुबाई मारके असल्याची ओळख पटवून तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान, सखुबाई यांनाही आपले पैसे हरवल्याची माहिती नव्हती. पैसे शोधताना पिशवीत पाकीट नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी “माझे पैसे पडले आहेत” असे सांगितले.शुक्रवारी बाजारात प्रचंड गर्दी असते. अशा वेळी पाकीट चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र अनुजा ढोलेकर यांनी प्रामाणिकपणे चौकशी करून सायंकाळी सखुबाई मारके यांना ५ हजार रुपयांचे पाकीट परत केले.रोज मजुरी करून पै-पै साठवून चांदीच्या पाटल्या बनविल्या होत्या, असे सखुबाईंनी भावूक होत सांगितले. आज २६ डिसेंबर रोजी अनुजा ढोलेकर, कैलास ढोलेकर, सरपंच अशोक खरात, पत्रकार अशोक इंगळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश गिरी यांच्या उपस्थितीत पाकीट परत करण्यात आले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

