Mahabreaking

[breaking_news]

MLA Manoj Kayande : आमदार मनोज कायंदेचे नेतृत्व ठरले निर्णायक

MLA Manoj Kayande : विधानसभा निवडणुकीतील पराभवाची सल अजूनही मनात असलेल्या दोन्ही माजी आमदारांनी विधानसभेनंतर प्रथमच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत केलेली युती देऊळगाव राजा येथील मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे आजच्या निकालावरून दिसून आले आहे. तब्बल २५–३० वर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन माजी आमदारांनी केलेली नगर विकास आघाडीची अनैसर्गिक युती मतदारांच्या पचनी न पडता अखेर महायुतीने पालिकेवर दणदणीत विजय मिळवला.नगर पालिकेत युवा आमदार मनोज कायंदे यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आहे.

MLA Manoj Kayande's

दे. राजा पालिकेत अनैसर्गिक युती नगर विकास आघाडीला ठरली निराशादायक

गजानन तिडके

देऊळगाव राजा : विधानसभा निवडणुकीतील पराभवाची सल अजूनही मनात असलेल्या दोन्ही माजी आमदारांनी विधानसभेनंतर प्रथमच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत केलेली युती देऊळगाव राजा येथील मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे आजच्या निकालावरून दिसून आले आहे. तब्बल २५–३० वर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन माजी आमदारांनी केलेली नगर विकास आघाडीची अनैसर्गिक युती मतदारांच्या पचनी न पडता अखेर महायुतीने पालिकेवर दणदणीत विजय मिळवला.नगर पालिकेत युवा आमदार मनोज कायंदे यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आहे.

सुरुवातीपासूनच चुरशीची लढत

देऊळगाव राजा नगरपालिकेची निवडणूक सुरुवातीपासूनच चुरशीची ठरली होती. आजी-माजी दिग्गज लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठेची लढत केल्यामुळे निवडणुकीला अधिकच रंगत आली. मात्र, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या काही कार्यकर्त्यांना ही युती पचनी पडली नाही. परिणामी, शहरातील काही प्रभागांत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून क्रॉस व्होटिंग झाल्याचा फटका नगर विकास आघाडीला बसला आणि अनेक उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

याचप्रमाणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडूनही अशाच प्रकारची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. अंतर्गत नाराजी आणि विसंवाद याचा थेट परिणाम नगर विकास आघाडीच्या पराभवावर झाला.

ओबीसी फॅक्टर ठरला निर्णायक

निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी जातीयवादाचे वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीसा परिणाम निवडणुकीत जाणवला असला, तरी बहुतांश प्रभागांत ओबीसी मतदारांचा प्रभाव निर्णायक ठरला. केवळ जातीय समीकरणे जुळवून निवडणूक जिंकता येत नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

आमदार मनोज कायंदे यांचा करिष्मा कायम

विभागाचे युवा आमदार मनोज कायंदे यांचा करिष्मा या निवडणुकीत ठळकपणे दिसून आला. प्रभागनिहाय युवकांना विश्वासात घेऊन उमेदवारी देण्याचा निर्णय, टीकेला उत्तर न देता विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका आणि गेल्या एका वर्षातील कामगिरी यामुळे मतदारांनी महायुतीला भरभरून कौल दिला. परिणामी, देऊळगाव राजा नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा आणि मित्रपक्षांच्या हाती गेल्या.

महायुतीचे नेतृत्व

या विजयामागे आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष नाझर काझी, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश मांटे, डॉ. सुनील कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, ज्येष्ठ नेते महंमद सिद्दीक शेख, भगवानराव मुंडे, प्रा. दिलीप सानप, युवा नेते गजानन काकड, प्रा. सुभाषराव दराडे, प्रा. सदाशिव मुंडे, सुनील शेजुळकर यांच्यासह महायुतीतील अनेक नेत्यांचा सक्रिय सहभाग होता.

 

“शहरातील सुज्ञ मतदारांनी भूतकाळात पालिकेत झालेल्या विकासकामांचा अनुभव घेतला आहे. बालाजी महाराज नगरीला नवचैतन्य देण्यासाठी मतदारांनी आम्हाला भरभरून कौल दिला असून, पालिकेअंतर्गत सर्व विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल,”
अशी प्रतिक्रिया आमदार मनोज कायंदे यांनी व्यक्त केली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top