Mahabreaking

[breaking_news]

Sant Gadge Baba : मॉडेल डिग्री कॉलेज, बुलढाणा येथे संत गाडगे बाबांना अभिवादन

Sant Gadge Baba : थोर समाजसुधारक, संत व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा येथे अभिवादनाचा कार्यक्रम श्रद्धा व आदरभावाने पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.

Sant Gadge Baba

बुलढाणा : थोर समाजसुधारक, संत व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा येथे अभिवादनाचा कार्यक्रम श्रद्धा व आदरभावाने पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.

यावेळी महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसने यांनी संत गाडगे बाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. स्वच्छता, सेवा, शिक्षण व सामाजिक समता हे त्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक असल्याचे सांगत, “समाजपरिवर्तनासाठी केवळ उपदेश नव्हे तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे, हे संत गाडगे बाबांच्या कार्यातून स्पष्ट होते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमात प्रा. बलवंत विणकरडॉ. प्रा. मनीषा राऊत यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगे बाबांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. अंधश्रद्धा निर्मूलन, समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शीला दाभाडे रोकडे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. समृद्धी गोडबोले यांनी केले. कार्यक्रमास प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. विद्या म्हळसने, प्रा. शिल्पा सादतकर, प्रा. महेश व्यवहारे, प्रा. धनंजय साखरे, प्रा. अर्चना पाटील, प्रा. प्राजक्ता काळे, प्रा. अंजली लांडकर, तसेच मंगेश जोशी, मामू यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संत गाडगे बाबांच्या विचारांची ओळख होऊन सामाजिक बांधिलकी, स्वच्छता व सेवाभावाची प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top