Mahabreaking

[breaking_news]

Police Inspector Amarnath Nagare :विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा – ठाणेदार अमरनाथ नागरे

Police Inspector Amarnath Nagare : आजच्या काळात पालकांबरोबरच विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करत आहेत. मात्र, बहुतांश विद्यार्थी मोबाईलचा वापर केवळ रील पाहणे व सोशल मीडियावरील खात्यांसाठी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हाच मोबाईल सायबर फसवणूक व अश्लीलतेसाठी वापरला जात असल्याने विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे व यश संपादन करावे, असे आवाहन डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी केले.

Police Inspector Amarnath Nagare

डोणगाव : आजच्या काळात पालकांबरोबरच विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करत आहेत. मात्र, बहुतांश विद्यार्थी मोबाईलचा वापर केवळ रील पाहणे व सोशल मीडियावरील खात्यांसाठी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हाच मोबाईल सायबर फसवणूक व अश्लीलतेसाठी वापरला जात असल्याने विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे व यश संपादन करावे, असे आवाहन डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी केले.

दे. भ. हि. सो. उर्फ बाबुराव पाटील विद्यालय, लोणी गवळी येथे दिनांक १९ डिसेंबर रोजी आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणेदार अमरनाथ नागरे उपस्थित होते. तसेच शिक्षक नितीन पाटील, पी. पी. वानखेडे, एस. व्ही. गव्हाड, संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थाध्यक्ष भास्करराव पाटील व प्राचार्य सुरेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात ठाणेदार नागरे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, लैंगिक अत्याचाराविषयी जनजागृती तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर व त्यापासून दूर कसे राहावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद लिंक उघडू नये, तसेच काही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी तसेच शिक्षकांशी संवाद साधून शालेय वेळेत उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत माहिती घेतली व त्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विवेक नागरीक यांनी केले. कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top