Mahabreaking

[breaking_news]

Women’s parents’ meeting : देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महिला पालक मेळावा 

Women’s parents’ meeting : देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दे. राजा येथे दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने महिला पालक मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

Women's parents' meeting

देऊळगाव राजा  : देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दे. राजा येथे दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने महिला पालक मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महिला पालकांच्या स्वागताने झाली. सौ. निमोडिया यांनी उपस्थित पालकांचे स्वागत करून कार्यक्रमाची भूमिका मांडली. कार्यक्रमास व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोल्हे सर तसेच पर्यवेक्षक श्री. जाधव सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, नैतिक व सामाजिक विकासासाठी पालक-शाळा समन्वयाचे महत्त्व विशद केले.

यानंतर सौ. मल्लावत, सौ. भोरसे व सौ. गाडेकर यांनी विद्यार्थिनींच्या शिस्तबद्ध वर्तनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच वाढत्या सोशल मीडियाचे दुष्परिणाम आणि मासिक पाळीबाबत योग्य माहिती देत महिला पालकांमध्ये जागृती निर्माण केली.

पालक प्रतिनिधी म्हणून सौ. कल्पना कुलकर्णी यांनी कार्यक्रमाबद्दल समाधानकारक व सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ. थोरवे यांनी आभार प्रदर्शन केले. महिला पालक मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top